The health effects of too much sleep

रात्रीच्या वेळी पुरेपूर झोप झाली असली तरी दुपारी झोपणे योग्य कि अयोग्य ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । साधारण काही ठिकाणी दुपारच्या वेळेत झोपले जाते अनेक वेळा ज्या स्त्रिया घरी असतात किंवा अनेक लोकांना इतर कोणतेही कामे नसतात अश्या वेळी त्यांचा आवडीचा छंद म्हणजे दुपारच्या वेळेत थोड्या प्रमाणात तरी गाढ झोपणे होय पण जर रात्रीची झोप पूर्णतः झाली असेल तर दुपारचे झोपणे गरजेचे आहे का ? हेही जाणून घेणे आवश्यक आहे .

रात्रीची झोप ही आरोग्यासाठी उत्तम असते. रात्री ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश जण रात्री ६ तास झोपून दुपारी २ तास का होईना झोप घेतात. हे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. त्यापेक्षा रात्री पुरेशी झोप घ्यावी आणि शक्य असेल तर दुपारी २० मिनिटे वामकुक्षी घ्यावी. वामकुक्षी म्हणजे डाव्या बाजूला झोपुन अंग सैल सोडून डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करावे. पण दुपारी फक्त काही मिनिटेच झोपून घ्यावे . जास्त वेळ झोपणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही.

एखादे वेळेस म्हणजे प्रवासा दरम्यान किंवा कार्यक्रमा निमित्ताने रात्रीचे जागरण झाले असल्यास अशा वेळी दुपारी 1 ते 2 तास झोप घेण्यास काहीही अडचण नाही. मात्र हे नियमितपणे घडणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. अनेक वेळा असा अनुभव येतो कि, जे लोक दुपारच्या वेळेत जास्त झोपतात त्याचे वजन हे खूप वाढते. अंग जाड होते आणि आळस हा निर्माण होतो. त्यामुळे कामाचा कंटाळा हा जास्त प्रमाणात येतो. पुरेशी झोप घेतल्यास दिवसभर फ्रेश राहतो, काम करण्याचा कंटाळा येत नाही, कार्यशक्ती वाढते. आपल्या कामाचे आणि झोपेचे नियोजन जर योग्य प्रमाणात केले तर ते आपल्याला फार लाभकारी होते. ज्यांना आपले आरोग्य हे निरोगी राहावे असे वाटते त्या लोकांनी दुपारच्या वेळेत अजिबात झोपू नये.