| | |

नखांच्या सौंदर्यासाठी पार्लर कशाला?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या सौंदर्याच्या व्याख्येत नखांचा समावेश होतो का? अर्थातच होतो. कारण सुंदर आणि लांब नखे आपल्या बोटांना लक्षवेधक बनवितात. यामुळे अनेक स्त्रिया आपल्या नखांना अगदी फुलाप्रमाणे जपतात. यासाठी स्त्रिया पार्लरमध्ये कितीतरी महागड्या ब्युटी ट्रीटमेंटचा आधार घेतात. यात प्रामुख्याने पार्लरमध्ये महागड्या मॅनीक्योरमुळे नखांना एक सुंदर आकार येतो आणि नख उठून दिसतात. अशी एक साधी आणि सोप्पी विचारसरणी आहे. पण आजही अजूनही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या वेळेचा अभाव आणि आर्थिक स्थितीमुळे नखे सुंदर करण्यासाठी पार्लरमध्ये जात नाहीत. अशा स्त्रिया घरच्या घरीसुद्धा आपली नखे सुंदर बनवू शकतात. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, नखं तुटण्याची अनेक कारणे असू शकतात. यामुळे अनेकदा स्त्रियांची नखे वाढण्याआधीच त्यांना क्रॅक जातो. यामुळे नखांच्या आरोग्यावरही गदा येते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे तुमची कमकुवत नख स्ट्रॉंग आणि सुंदर बनवण्यासाठी मदत करतील. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) लसूण – जर तुमची नखं कमकुवत असतील तर ती मजबूत बनवण्यासाठी लसूण सहाय्यक आहे. यासाठी लसणीचे फक्त २ पाकळ्या पुरेश्या आहेत. यासाठी नखाच्या आतील भागावर लसूण लावून ठेवा. यासाठी आपण लसणाचा रसदेखील लावू शकतो. नखे मजबूत करण्यासाठी लसूण वापरल्यास नखे वाढण्यापूर्वी तुटत नाहीत.

२) लिंबू – लिंबू नखे स्वच्छ करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे नखांमधील डाग काढून टाकण्यास मदत होते. यासाठी फक्त फक्त एका वाटीत १ चमचा बेकिंग सोडा आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. यामध्ये साधारण १० मिनिटे नखं बुडवा आणि नंतर ब्रशने हलक्या हाताने आपली नखं स्वच्छ करा. काही वेळाने आपली नखे धुवून स्वच्छ करा. अशाप्रकारे दररोज वा आठवड्यातून ३-४ वेळा नखे स्वच्छ करा.

३) गुलाब पाणी – गुलाब पाणी आपल्या नखांची सर्व बाजूने काळजी घेण्यास सक्षम आहे. कारण गुलाब पाण्यामध्ये अॅण्टी सेप्टिक, अॅण्टी बॅक्टीरियल आणि अॅण्टी ऑक्सिडंट गुणधर्म समाविष्ट असतात. यामुळे गुलाब पाणी कमकुवत नखांच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेते. हे नखांच्या आतील बाजूस साफ करते आणि नखांना पोषण देऊन मॉइश्चराइझ ठेवते. यामुळे आपले हात साफ केल्यानंतर हे नियमितपणे वापरा. यामुळे नखे गुलाबी, सुंदर आणि मजबूत होतील.

४) ऑलिव्ह ऑईल – ऑलिव्ह ऑईलमध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे ऑलिव्ह ऑइल आपल्या नखांना खोलवर पोषण देतात आणि चमकदार देखील बनवतात. सर्व प्रथम, आपली नख नीट स्वच्छ करा. यानंतर ऑलिव्ह ऑइल एका छोट्या वाटीत गरम करा. त्यात आपली बोटं बुडवा आणि १५ मिनिटे ठेवा. पुढे १५ मिनिटांनी नखं स्वच्छ टॉवेलने पुसून टाका. आपण ही क्रिया दररोज केल्यास आश्चर्यकारक फरक दिसेल.