loss confidance of child

आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी तर नाही ना ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  अनेक वेळा आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक मुले पाहतो कि , त्या मुलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास हा अजिबात नसतो. आत्मविश्वास नसल्याने त्या मुलाना अनेक वेगवगेळ्या समस्यांना सामोरे जायला लागू शकते. मुलांमध्ये आत्मविश्वास कमी असण्याची कारणें हि प्रत्येक वेळेला वेगवेगळी आहेत. मुलांमध्ये आत्मविश्वास याचा अभाव आढळला तर मात्र त्यातून बाहेर काढणे किंवा त्यांना आत्मविश्वासी बनवणे हे मोठे टास्क आहे. प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा हा आत्मविश्वासू असला पाहिजे याची काळजी घेतात.त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी आई वडिलांची असते. त्यासाठी काय प्रयत्न करू शकतो ते जाणून घेऊया …

मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमी असेल तर त्यावेळी मुलांना पुरेसा वेळ देऊन मुलांच्यामधील आत्मविश्वास वाढवू शकता. त्यासाठी मुलाना कोणत्याही ठिकाणी शिकण्यासाठी पाठवण्याची गरज अजिबात नाही. कुटुंबाने आणि पालकांनी देलेली साथ मुलाना त्या गोष्टीतून बाहेर निघण्यास मदत करते. आजकाल प्रत्येक आईवडील हे आपल्या कामात व्यस्त असतात. मुलांना कोणत्याही गोष्टीची कमतरता कमी भासली जाऊ नये , म्हणून सगळेच आई वडील प्रयत्न करत असतात. त्यावेळी मुलाना हवा तेवढा वेळ मात्र आईवडिलांना देता येत नाही. त्यामुळे दररोज थोडा का होईना वेळ हा आपल्या मुलाला देणे आवश्यक आहे.

— जास्तीत जास्त वेळा देण्याचा प्रयत्न करा.

मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्यास त्यांच्या सह जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांना समजून घ्या. त्यांची कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका. जास्त वेळ घालवण्याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण त्यांना सूचना करत राहा. ज्यावेळी ते मोकळे आणि एकटे बसले आहे त्यावेळी त्यांच्याशी गप्पा करा. त्यांना प्रत्येक गोष्टीचे महत्व समजावून द्या. बोलण्यातून त्याच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीबाबत प्रश्न आहेत याची माहिती घ्या. त्याच्या बरोबर वेळ दिल्याने आपल्या मुलांच्या मध्ये अश्या कोणत्या गोष्टी आहेत , त्यामुळे मुलगा हा डिस्टर्ब आहे ते जाणून घ्या.

—- सुरक्षेची हमी द्या

आपल्या मुलाला कुठे आणि कशा परिस्थितीत सुरक्षित वाटतं ह्याची खात्री करा. आणि त्याला कुठे आणि कोणाबरोबर असुरक्षित वाटतं ह्याचा तपास करा. कारण ह्याच काही गोष्टी मुलांमधील आत्मविश्वासाला कमी करत किंवा वाढवत. त्यांना आपल्या सहवासात किती सुरक्षित वाटत याची माहिती घ्या,

 

—- छोट्या छोट्या गोष्टींसाठी कौतुक करा.

आपण मुलांना जर एखादे काम सांगितले तर त्यावेळी मुलांनी चुकीच्या पद्धतीने का होईना पण केले तर त्यावर त्यांना चिडू नका . त्यांच्यावर रागावू नका तर त्यांना प्रमाणे जवळ घ्या. चुकी सांगा आणि तसेच त्यांचे कौतुक पण करा. कारण जर सतत मुलांच्या मधील चुका काढल्या तर मात्र मुलाना नंतर कोणतेच काम करण्याची इच्छा निर्माण होत नाही , तसेच त्यांच्यामध्ये तेवढे काम करण्याचे धाडस सुद्धा तयार होत नाही.

—- जबाबदारी सोपवा

मुलांच्या आत्मविश्वासाला वाढविण्याचा सर्वात चांगला आणि उत्तम मार्ग आहे की आपण त्यांच्या वर कमीतकमी जबाबदाऱ्या सोपवा. ज्यावेळी ते छोट्या छोट्या गोष्टी करतील त्यावेळी त्यांना त्या कामाबद्धल प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होईल तसेच कधी कधी एखादी गोष्ट जबाबदारी ने करण्याची सवय लावा यातून सुद्धा तुमच्या मुलांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. जर ते अडचणीं मध्ये येतात तर त्यांना पुरेसा वेळ द्या आणि समजवा की कशा प्रकारे या समस्येचा तोडगा काढता येईल. लगेचच मदतीसाठी धावत जाऊ नका. काही गोष्टी स्वतः करण्याचा प्रयत्न करायला सांगा .