Caster Sugar
| | |

सामान्य साखरेऐवजी खडीसाखर खाणे फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खडीसाखर आयुर्वेदिक औषधांपैकी एक आहे. अगदी खोकल्यापासून ते मूड स्विंगपर्यंत प्रत्येक समस्येवर खडीसाखर गुणकारी आहे. आर्युवेदानुसार खडीसाखर गुणधर्माने थंड असते. शिवाय ती वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी असते. परिणामी सामान्य साखरेपेक्षा खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम मानली जाते.

खडीसाखरेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड असतात. भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले व्हिटॅमिन बी 12 हे खडीसाखरेतून मिळते. याशिवाय १५ ग्रॅंम खडीसाखरेतून शरीराला सुमारे 60 कॅलरिज मिळतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात खडीसाखर उपयोगाची नक्कीच आहे. चला तर जाणून घेऊयात फायदे खालीलप्रमाणे:-

१) खोकल्यापासून सुटका मिळते –

सतत कफ आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर खडीसाखर वा पत्री खडीसाखर चघळा. खोकला सुरू झाल्यावर तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवल्यास थोडा आराम मिळेल. फक्त खडीसाखर चावून खाऊ नका. ती तोंडात ठेवा आणि चघळा. याशिवाय खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यानेदेखील खोकला दूर होईल.

२) मानसिक ताणतणाव दूर होतो –

खडी साखर मेंदूला आराम देण्यासाठी सहाय्यक आहे. ज्यामुळे साहजिकच मानसिक थकवा दूर होतो. यासाठी दररोज खडीसाखर आणि अक्रोडची पावडर एकत्र दूधात मिसळून प्या. ज्यामुळे आपोआपच तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुमचा मूड नेहमी चांगला राहील.

३) पचनसंस्थेसाठी लाभदायक –

अन्नपचन संबंधित कोणताही त्रास असेल तर खडीसाखर अत्यंत लाभदायी आहे. यासाठी जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर खा. असे केल्यास एकतर अन्न पचन व्यवस्थित होते आणि पचनसंस्था मजबूत होते. शिवाय अन्न लवकर पचते आणि अपचनाच्या समस्या दूर होतात.

४) दृष्टी सुधार –

खडीसाखर खाण्यामुळे दृष्टी सुधारते. या फायद्यासाठी निमित्त जेवणानंतर वा दोन जेवणाच्यामध्ये खडीसाखरेचे पाणी प्या. असे केल्यास दृष्टीदोष कमी होतात. शिवाय मोतीबिंदूपासून बचाव होतो.

५) तोंडाचे इनफेक्शन दूर होते –

खडीसाखरेमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. शिवाय खडीसाखरेमुळे तोंडाचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. सतत तोंड येत असेल तर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवा. असे केल्यास तोंडात संसर्गामुळे होणारी जळजळ आणि दाह कमी होतो.

६) घश्याच्या तक्रारी दूर होतात –

घशाच्या कोणत्याही तक्रारीवर खडीसाखर प्रभावी आहे. कारण खडीसाखरेमुळे घसा लवकर स्वच्छ आणि मोकळा होतो. त्यामुळे घशात कोरडेपणा वा आवाज बसणे अशा समस्या जाणवल्या तर सुंठीचा खाडी साखर मिसळून खा.

७) तोंडाची दुर्गंधी निघून जाते –

कोणत्याही कारणामुळे जर तोंडाला घाणेरडा वास येत असेल तर खडीसाखरेचा वापर मुखवासाप्रमाणे करा. असे केल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. यासाठी बडीशेप आणि खडीसाखर एकत्र मिसळून खा. तोंडाची दुर्गंधी काही क्षणात दूर होईल.