| | |

हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे ऊर्जादायी पदार्थ खाणे फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याच्या दिवसात शरीराला उष्णतेची गरज असते. हि गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारात काही बदल गरजेचे असतात. जसे कि रोजच्या आहारापेक्षा स्निग्ध पदार्थ आणि उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करणे. याचे कारण म्हणजे हिवाळ्याच्या मध्यान्हापासून सुरु होणारी थंडी हि एका मर्यादेनंतर शरीरासाठी असह्य वेदना घेऊन येते. दरम्यान तीव्र थंडीमध्ये सांधेदुखी आणि रक्तदाबासारख्या समस्या बळावतात. यासाठी आहारात गूळ, शेंगदाणे आणि तीळ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे हिवाळ्यात या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश कराच. यातील तीळ हे विशेष पोषकता देण्यास सक्षम असतात. यासाठी तुम्ही तिळाचे लाडू, तिळाची खीर, तिळाच्या वड्या, तिळाची चिक्की असे विविध पदार्थ बनवून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला देऊ शकता. यामुळे रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीराला आवश्यक उष्णता मिळते. चला तर जाणून घेऊयात तिळाचे पदार्थ खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकार शक्तीत वाढ – आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल तर आपले आरोग्यदेखील व्यवस्थित राहू शकते. कारण आपली रोग प्रतिकार शक्ती आपल्या शरीराचे कोणत्याही विषाणूपासून संरक्षण करते. मात्र जागतिक रोगाचा पुन्हा पुन्हा होणारा फैलाव आपल्या रोग प्रतिकार शक्तीला कमकुवत करीत असतो. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही लगेच आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणून दैनंदिन आहारात तिळाचा समावेश गरजेचा आहे. कारण यातील पोषक घटक आपल्या शरीराच्या रोग प्रतिकार शक्तीस सुरक्षित ठेवण्यास सहाय्यक असतात.

२) संधीवातावर परिणामकारक – थंडीमध्ये संधीवाताचा तसेच गाऊटचा त्रास वाढतो. अशावेळी कॅल्शियमयुक्त तीळाचे लाडू खाल्ले तर चांगला फरक पडतो. हिवाळ्यात वात वाढल्याने सांधेदुखीचा त्रास होतो. शिवाय छातीत जळजळ वाढते. तर यावर तीळ परिणामकारक आहेत. यासाठी भाजलेले तीळ किंवा तिळाचे कोणतेही पदार्थ खाणे फायदेशीर आहे.

३) पचनक्रियेत सुधार – हिवाळ्यात आपली पचन क्रिया कमकुवत होण्याची शक्यता असते. कारण सतत लागणारी भूक आपल्याला सतत खायला प्रवृत्त करते. परिणामी पचन संस्थेवर ताण येतो. अशावेळी भूक लागल्यास तिळाचे पदार्थ खाल्ले तर पचनक्रियेला त्रास होत नाही. तसेच जेवण तिळाच्या तेलात बनविणेदेखील फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि शरीराला अधिक लाभ होतो.

४) थंडीतील सर्दी खोकल्यावर प्रभावी – तिळाचे लाडू स्वभावाने उष्ण असतात. त्यामुळे हिवाळ्यात ते आपल्या शरीरात उष्णता निर्माण करून आपल्याला उब देतात. म्हणून हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे फायदेशीर मानले जाते. शिवाय तिळामूळे खोकला, सर्दी आणि ताप या सामान्य आजारांपासून सुटका होते.

५) ताण तणाव होईल दूर – तिळामध्ये असणारे प्रोटीन, कॅल्शियम आणि ‘बी’ कॉम्प्लेक्सचे मेंदू तणावमुक्त ठेवतात. परिणामी ताण तणाव दूर राहतो. यासाठी दररोज साधारण ५० ग्रॅम तीळ जरूर खा.