Childrens
|

कॅन्सरच्या धोक्यापासून लहान मुलांचे संरक्षण करणे आवश्यक; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणत्याही वयातील पालकांसाठी त्यांची मुले त्यांचं जग असतं. यामुळे कितीही मोठी झाली तरी आपली मुलं त्यांना लहानच वाटत असतात. लहानपणापासून हाताच्या तळफोडाप्रमाणे मुलांना वाढविणे हि भावनाच वेगळी असते. पण आजकालचे पालक त्यांच्या मनात कितीही असले तरीही मुलांना पुरेसा वेळ देण्यात अक्षम ठरतात. नियमित जीवनशैली आणि कामाचा व्याप यामध्ये अनेकदा मुलांकडे दुर्लक्ष होते. यामुळे आपली मुलं मानसिकरीत्या आणि शारीरिक दृष्ट्या कमकुवत होत आहेत हे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही.

आजकाल भयंकर विषाणूंची तीव्रता पाहता मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण तज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांमध्ये कॅन्सरच्या लक्षणांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अशावेळी पालकांनी मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर आज आम्ही तुम्हाला मुलांमध्ये आढळून येणारी ती सर्व लक्षणे सांगणार आहोत , ज्यांच्या सहाय्याने आपली मुले कॅन्सरला बळी पडत असल्याचे निदर्शनास येऊ शकते. इतकेच नव्हे तर लक्षणांसोबत आपण काही उपाय देखील जाणून घेणार आहोत खालीलप्रमाणे:-

लहान मुलांना कॅन्सर झाल्यास दिसणारी लक्षणे

१) त्वचा पिवळी होणे
२) तोंडातून आणि नाकातून रक्त येणे
३) हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे
४) शारीरिक थकवा
५) पाठदुखी
६) पोटात वा मांडीवर गाठ तयार होते
७) मळमळणे, उलट्या होणे
८) वारंवार ताप येणे
९) अचानक वजन कमी होणे
१०) दृष्टीदोष येणे

लहान मुलांना कॅन्सर होण्याची कारणे

याशिवाय काही अन्य आजारांमुळेदेखील मुलांना कॅन्सर होऊ शकतो. डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये ल्युकेमियाची शक्यता दहापट जास्त असते. या शिवाय कॅन्सर हा रोग अनुवांशिक असू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला कॅन्सर असेल, तर तुमच्या मुलाला भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता असते. यांमध्ये 'रेटिनोब्लास्टोमा' हा डोळ्यांच्या कॅन्सर दुर्मिळ प्रकार आहे. जो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो. यात मुलांना दृष्टिदोष येतो आणि डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे असे झाल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय EVB संसर्ग झाल्यासही आहे. मुलांमध्ये कॅन्सर पसरतो.

कॅन्सरपासून मुलांना वाचवायचे असेल तर हे लक्षात ठेवा

कॅन्सरपासून मुलांचे रक्षण कारण्यासाठी, विशेषतः आधी स्वत:ला आणि आपल्या मुलांना व्यसनाधीन होऊ देऊ नका. धूम्रपान किंवा तंबाखूच्या आहारी गेल्यास कँसर होण्याची शक्यता बळावते. याशिवाय रोजच्या आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. दरम्यान मुलांच्या त्वचेकडे तसेच मुलांच्या वजनाकडे विशेष लक्ष द्या. यामुळे मुलांच्या शारीरिक बदलातील फरक दिसून येईल आणि त्यावर वेळीच काम करू शकाल.