| |

गर्भारपणात केसर खाणे योग्य का अयोग्य?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| गर्भावस्थेत स्त्रीने स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण ही स्थिती अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे कोणतीही गोष्ट खाण्याआधी त्याची संपूर्ण माहिती मिळवणे कधीही उत्तम. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. अनेक लोक सांगतात की गर्भारपणात केसर खाण्याचे बरेच फायदे आहेत. पण मैत्रिणींनो केसर खाण्याचे योग्य प्रमाण माहित नसेल तर गर्भावस्थेत हेच केसर नुकसानदायक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गर्भावस्थेत केसर खाण्याचे फायदे आणि त्याचसोबत नुकसान दोन्हीही सांगणार आहोत. त्यामुळे ही माहिती दुर्लक्ष करू नका. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० गर्भावस्थेत केसरचे सेवन योग्य आहे?
– जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर हो असे आहे. गोल्डन स्पाईस नावाच्या केसरमध्ये संपूर्ण औषधीय गुणधर्म असतात. हे केसर गर्भावस्थेत येणारा ताणतनाव दूर करण्यासोबत आणि मुड स्विंग्सचा त्रास संपवते. परंतु केसर खाताना काळजी घेणं आवश्यक आहे. कारण केसर मुळातच खूप महाग मिळत असल्याने त्यात अनेक प्रकारची भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केसर शुद्ध असल्याची खात्री पटल्यानंतरच त्याचे सेवन करा.

० केसरचे फायदे –

१) मुड स्विंग्स दूर – गर्भावस्थेत हार्मोन्समध्ये वेगाने बदलतात. यामुळे भावना सतत बदलत असतात. कधी खूप आनंदी, तर कधी दुःखी, तर कधी चिडचिड सुद्धा होते. अशावेळी केसर खूप फायदेशीर आहे. केसर अॅंटि-डिप्रेसेंटचं काम करते आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत केते. केसरच्या सेवनाने शरीरातील सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स वाढतात आणि त्यामुळे ताण कमी होऊन मुड चांगला राहतो.

२) रक्तदाबावर नियंत्रण – गर्भावस्थेत रक्तदाबाचे प्रमाण वाढल्यामुळे प्रीक्लॅम्पसिया होतो. प्रीक्लॅम्पसिया ही एक गर्भधारणा व्याधी आहे. याला विषबाधा म्हणूनही संबोधले जाते. जर या विकारामुळे गर्भवती स्त्रीची प्रकृती बिघडली तर तिच्या व गर्भातील बाळाला हानिकारक ठरु शकते. अश्यावेळी केसर गुणकारी ठरते. केसरमध्ये असलेलं पोटॅशिम आणि क्रोसेटिन रक्तदाबाला नियंत्रणात ठेवतात आणि यामुळे प्रीक्लॅम्पसिया होत नाही.

३) पचनक्रिया सुरळीत – प्रेग्नेंसीदरम्यान ब-याच स्त्रियांना पोटदुखी, अपचन आणि गॅसेसची तक्रार असते. कारण प्रेग्नेंसीदरम्यान पचनक्रिया खूप हळू होते. त्यामुळे प्रेग्नेंसीच्या काळात महिलांना पचनास हलक्या असतील आणि पचनक्रिया सहज होण्यास मदत करतील अश्या बंधनकारक असते. अशावेळी केसर पचनक्रियेसाठी उपयुक्त ठते . कारण केसर पचनक्रिये दरम्यान रक्तप्रवाह सुरळीत ठेवते आणि चयापचयाची क्षमता वाढवते.

० केसरमुळे होणारे नुकसान –

१) मळमळ आणि अॅलर्जी – गर्भारपणात केसरचे सेवन केल्यानंतर ब-याच महिलांना मळमळ किंवा उलटी होण्यास सुरूवात होते. यामुळे स्त्रिया ज्या पोषक तत्वांचे सेवन करतात ते शरीराबाहेर फेकले जातात. त्यामुळे जर तुम्हाला केसर खाल्ल्यानंतर उलटी होऊ लागली तर ते खाणे लगेच बंद करा. तसेच ब-याच स्त्रियांना केसर खाल्ल्यांतर अस्वस्थ वा बैचेन वाटते, डोकेदुखी होते किंवा तोंड सुकण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे यापैकी कोणतेही परिणाम दिसले तर केसरचे सेवन थांबवा.

२) गर्भपाताचा धोका – गर्भावस्थेत जास्त प्रमाणात केसर खाल्ल्याने गर्भाशय आकुंचन पावते आणि यामुळे अनेक प्रकारचे साईड इफेक्ट होतात. केसर गरम असल्यामुळे त्याचे सेवन केल्यास शरीरातील गरमी वाढते व शरीराचे तापमान देखील वाढते. त्यामुळे गर्भाशयातील आकुंचन वाढते. अशावेळी प्रेग्नेंसीच्या सुरवातीच्या काही महिन्यात केसर खाल्ल्याने गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब-याचदा प्रेग्नेंट महिलांना हा सल्ला दिला जातो की, गर्भावस्थेच्या ३ ते ६ महिन्यांच्या दरम्यान केसर खाण्यास सुरूवात करावी आणि ती देखील गॉयनॅकोलॉजिस्टचा सल्ला घेऊनच!

० महत्वाचे :-
– केसरच्या अतिसेवनाने गर्भातील बाळाला धोका पोहचतो. म्हणून २ ते ३ काड्यांपेक्षा जास्त प्रमाणात केसरचे सेवन टाळा.
– गर्भावस्थेच्या ३ महिन्यांनंतर केसर खाणे सुरू करा.
– प्रेग्नेंसीच्या सुरवातीच्या ३ महिन्यांत केसर केसर खाणे घातक ठरेल.