| |

सारखं सारखं तोंड आल्याने खाण्यापिण्याचे झाले वांधे?; लगेच जाणून घ्या घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शरीरातील उष्णता वाढली कि साहजिकच त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर दिसून येतो. याशिवाय आहारात शरीराला न झेपणारे असे चुकीचे काही पदार्थ आले तर शरीराचे नुकसान निश्चितच. कारण यामुळे अॅसिडीटी, बद्धकोष्ठता आणि सगळ्यात जास्त प्रमाणात होणारा त्रास म्हणजे तोंड येणे. आता तोंड येणे म्हणजे काय? मित्रांनो जिभेवर वा तोंडात पाणीदार फोड येणे. तोंडाचे सालपट जाणे. या सर्व समस्या म्हणजेच तोंड येणे. या व्याधीमुळे खाण्यापिण्याचे पुरते वांधे होतात. हे सर्व हर्पीस सिम्पलेक्समुळे होते. यात बरेच दिवस तोंड येते. यामुळे काहीही खाल्लं वा प्यायलं तर तोंड भाजतं वा झोंबत. यावर उपाय म्हणून विविध औषध घेण्यापेक्षा घरगुती उपाय करणे फायदेशीर आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सोप्पे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत जे टन येण्याच्या समस्येवर प्रभावी काम करते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) तुळशीची पाने – आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळस हि असतेच. तुळस अत्यंत औषधी गुणांनी संपन्न असल्यामुळे तिला आरोग्यदायी मानले जाते. तुळशीचा अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंड येण्याच्या व्याधींपासून आराम देते. म्हणून तोंड आल्यास जीभेवर तुळशीची पेस्ट लावावी. यामुळे लगेच आराम मिळतो.

२) आवळा – आवळ्यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तोंड आलेले असताना आवळा खा किंवा आवळ्याचा रस प्या यामुळे आराम मिळतो.

३) हिरवी वेलची – हिरवी वेलची तोंडातील उष्णता कमी करते. यामुळे तोंड आल्यास हिरवी वेलची खाणे फायदेशीर आहे. यासाठी हिरवी वेलची बारीक कुटून त्यात मध टाकून चाटण तयार करा. आता काही वेळानंतर पाण्याची गुळणी करा आणि तोंड स्वच्छ करा. यामुळे आराम मिळतो.

४) नारळाचे तेल – नारळाचे तेल पौष्टीक घटकांनी समृद्ध असते. नारळाच्या तेलात अँटी इफ्लेमेटरी गुण असतात जे जिभेच्या आणि तोंडाच्या त्वचेवरील फोड वा अल्सर कमी करण्यात मदत करतात. यासाठी नारळाचे तेल दिवसातून ३-४ वेळा तोंडाला लावा.

५) एलोवेरा जेल – एलोवेरा जेल गुणधर्माने थंड असते. म्हणून एलोवेरा जेलचा वापर अल्सर वा तोंडातील पुळ्यांवर प्रभावी आहे. यामुळे तोंडातील उष्णता कमी होते आणि तोंडाचा लालसरपणा जातो. दरम्यान थोडावेळ जीभेवर एलोवेरा जेल ठेवल्यास जिभेला आराम मिळतो.