| |

चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांना भाकरीपेक्षा चपाती अत्याधिक प्रिय असते. त्यामुळे हे लोक प्रामुख्याने आपल्या आहारातील भाकरीचा समावेश टाळतात. मात्र चपातीपेक्षा भाकरी अन्नपचनाकरिता सोयीस्कर असते आणि त्यातही हि भाकरी जर ज्वारीची असेल तर आणखीच लाभदायक. कारण ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. यामुळे आपण ग्रहण करीत असलेले अन्न सहजोगत्या पचते. शिवाय पोटाच्या समस्यांतही आराम मिळतो, म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ज्वारीचे आरोग्यवर्धक फायदे :-

१) आजकाल दर दोन व्यक्तींच्या मागे एका व्यक्तीस ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या असतातच, हे आपण जातो. मात्र या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन अत्यंत गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्सचे संतुलित प्रमाणात असल्यामुळे आपले ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते आणि या आजारांपासून आराम मिळतो.

२) चुकीची जीवनपद्धती आणि दैनंदिन कामातील दगदगीमुळे अनेक महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. या संदर्भातील समस्यांमुळे अनेक महिला मातृत्वास मुकतात. मात्र जेवणात ज्वारीचे सेवन केले असता अश्या समस्यांना उभारी येत आणि त्यामुळे ज्वारीचे सेवन खुप महत्वाचे ठरते.

३) ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. यामुळे पोटातील घाण गुद्द्वारावाटे शरीरातून बाहेर जाऊन ते साफ होण्यास मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे त्यांनी आहारात मुख्य करून ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. शिवाय ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

४) ज्वारीच्या भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना विशेष फायदा होतो.

५) ज्वारी पचण्यास हलकी असते. यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्याने पोटावर ताण येत नाही आणि पोटावरील लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते. शिव्या ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

६) ज्वारी शरीरातील इन्सुलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी व फलदायी ठरते.

७) ज्वारीत असणारी पोषक तत्त्वे किडनीस्टोनला आळा घालतात, म्हणून किडनी स्टोनचा त्रास असेल तर ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थ आहारात समाविष्ट करणे अत्यंत फायद्याचे ठरेल.