| | |

फक्त १ महिना भाज्यांचा रस प्या आणि मिळवा मजबूत इम्युनिटी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कमकुवत रोग प्रतिकार शक्ती हि आपल्या शरीराचा कोणत्याही संसर्गापासून बचाव करण्यास सक्षम नसते. यामुळे आपल्याला कोणताही आजार अगदी सहज होऊ शकतो. इतकेच नव्हे तर, यामुळे आपले शरीर आजारपण लवकर सोडत नाही. डॉक्टरांच्या मते, आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. या काही गोष्टी म्हणजे, काही विशिष्ट भाज्या. ज्या आपल्या शरीराचे आतून आणि बाहेरून आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे अश्या भाज्यांचा रस अगदी महिनाभर जरी सेवन केला तरीही आपली रोगप्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी मजबूत होते. जाणून घेऊया कोणत्या भाज्यांचे रस पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे खालीलप्रमाणे:-

० गाजर आणि बीट रस
– आहारतज्ञ सांगतात कि, बीट आणि गाजराच्या रसाचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा अगदी सहज होतो. इतकेच नव्हे तर यातील पोषण मूल्य आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास सहाय्यक आहेत. तसेच गाजर आणि बीटच्या रसातील जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे हृदय, किडनी आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

० गाजर आणि बीटच्या रसाचे फायदे काय?
– गाजर आणि बीट या दोन्ही भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कारण बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन सी असते. तर गाजरात जीवनसत्त्व ए आणि सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे गाजर आणि बिट यांचा रस प्यायल्याने दृष्टी सुधार होतोच शिवाय यातील अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून रोगप्रतिकारक पेशींचे संरक्षण करतात.

० ‘या’ भाज्यांचे रस पिणे देखील फायदेशीर आहे.
– दुधी भोपळा, पालक, आवळा, आले यांसारख्या भाज्यांचे रस करून पिणे देखील आरोग्यासाठी लाभदायक आहे. कारण आल्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तर दुधी भोपळ्यात असलेले पोषक तत्व पोट आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. तसेच या भाज्यांच्या रसाची चव वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार काळे मीठ आणि मिरपूड देखील घालता येते.

० भाज्यांचा रस पिण्याचे फायदे काय?
– आहार तज्ञ सांगतात कि, दररोज सर्व प्रकारच्या भाज्यांचे रस प्यायल्याने शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे सहज पूर्ण होतात. शिवाय दुधी भोपळा, गाजर, बीट, कारले आणि पालक यांसारख्या भाज्यांच्या मिश्रित रसाचे सेवन केल्याने आतडे स्वच्छ राहते. परिणामी पचनासंबंधित कोणतीही अडचण येत नाही. इतकेच नव्हे तर पोटाच्या समस्या दूर होतात. याशिवाय या सर्व भाज्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यामुळे संसर्गापासून शरीराचा बचाव होतो.