| | |

हृदयाची असेल काळजी तर दुधात मिसळून खा कलौंजी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कलौंजी एक प्रकारचे बियाणे असते. हे काळ्या रंगाचे असते. याला बर्‍याच ठिकाणी काळी बियाणे देखील म्हणतात आणि बिहारच्या भागात याला मंगरेला देखील म्हणतात. तर मराठीत सर्वसामान्य भाषेत याला काळे तीळ म्हणतात. कलौंजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. प्रामुख्याने कलौंजीत लोह, सोडियम, पोटॅशियम, फायबर आणि बरेच खनिजे असतात. यात अमिनो एसिड देखील असते. या व्यतिरिक्त, हे शरीरात आवश्यक प्रथिने देखील प्रदान करते. यापासून तयार केलेले तेल आरोग्याशी संबंधित अनेक लाभ देते. शिवाय कलौंजीच्या बिया सर्वोत्कृष्ट अँटी- ऑक्सिडंट्सपैकी एक मानला जातो. यामुळे कलौंजी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण जर दुधासोबत कलौंजी खाल तर हृदयाच्या आरोग्याची चिंता करावी लागणार नाही. विश्वास बसत नाही? चला तर जाणून घेऊयात दुधात कलौंजी मिसळून खाण्याची पद्धत आणि फायदे खालीलप्रमाणे:-

० कलौंजीचे दुधातून सेवन कसे करावे?
– कलौंजीचे सेवन करण्यासाठी पाणी आणि दुध दोन्हीचा वापर करता येतो. मात्र, दुधासोबत कलौंजी खाल्ल्याने अधिक लाभ होतात. यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे:-
१/२ चमचा कलौंजी
१ ग्लास दूध
१ चमचा साखर

कृती
यासाठी एका भांड्यात दुध घाला आणि गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. यानंतर दुधात कलौंजी घाला आणि चांगली शिजू द्या. हे मिश्रण चांगले उकळी येईपर्यंत शिजवा. यानंतर, एका ग्लास मध्ये ओतून घ्या आणि यात साखर मिसळून ते प्या.

सेवन
दूध कलौंजीचे हे मिश्रण सकाळी रिक्त पोटी घ्या.

फायदे

१) कॅल्शियमची कमतरता भरते – शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी कलौंजी मिसळलेले दूध प्या. यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. शिवाय हाडांशी संबंधित कोणताही आजार होत नाही. यामुळे तुमची हाडे दुर्बल होणार नाहीत वा त्यांच्यात वेदनाही होणार नाही. यामुळे सांधेदुखीचा त्रास टाळता येतो. दातदुखी वा हिरड्यांना सूज येत असेल तर कलौंजी आणि दुधाचे मिश्रण जरूर प्या.

२) मधुमेहापासून संरक्षण – मधुमेहासारख्या गंभीर आजारापासून मुक्त होण्यासाठी दररोज कलौंजीचे दूध प्या. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होते आणि ग्लूकोज कमी होऊ लागते.परिणामी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचे कम्प्लिकेशन टाळता येते. अगदी मधुमेहातसुद्धा हे मिश्रण सेवन करता येईल.

३) पोटाच्या विकारांपासून बचाव – दररोज सकाळी रिक्त पोटी या मिश्रणाचे सेवन केल्यास पचनशक्ती वाढते. ज्यामुळे पोटातील आजार होण्याचा धोका कमी होतो. हे मिश्रण अन्नपचन होण्यास सहाय्यक ठरते. यामुळे पोटाशी संबंधित कोणत्याही विकारात हे मिश्रण फायदेशीर ठरते. अपचन, गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांनी कलौंजी आणि दुधाचे मिश्रण जरूर घ्यावे.

४) तणाव कमी होतो – दररोज सकाळी रिक्त पोटी कलौंजी आणि दुधाचे सेवन केल्यास ताण कमी होतो. तसेच मेंदूची एकाग्रता वाढते आणि ताण तणाव दूर होतो. इतकेच काय तर आपल्याला निद्रानाशदेखील होत नाही.

५) बॅड कोलेस्टेरॉलवर रोख – बॅड कोलेस्ट्रॉलचे वाढते नियंत्रण आणि प्रत्येक हृदयरोग टाळण्यासाठी कलौंजीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. कारण हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते आणि हृदयरोगापासून बचाव करते. शिवाय याच्या वापरामुळे, रक्तवाहिन्यांमधे अडथळा येत नाही वा हृदयविकाराचा धोकादेखील येत नाही.

६) लठ्ठपणावर नियंत्रण – लठ्ठपणामुळे आपले शरीर विविध आजारांचे घर होऊ लागते. पण या समस्येवर कलौंजीचे दूध अत्यंत गुणकारी मानले जाते. यामुळे लठ्ठपणापासून मुक्त व्हायचे असेल तर विविध औषधे खाऊ नका. यापेक्षा दररोज सकाळी रिक्त पोटी कलौंजीच्या दुधाचे सेवन करा. यामुळे चयापचय वाढते आणि लठ्ठपणा विसरूनच जा. कारण कलौंजीचे दूध प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळते आणि आपण सडपातळ तसेच तंदुरुस्त होतो.