| | |

त्वचेच्या कोणत्याही समस्येवर कस्तुरी हळद अत्यंत गुणकारी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। त्वचेच्या कोणत्याही विकारांपासून सुटका हवी असेल तर त्यासाठी हळदीपेक्षा उत्तम असा पर्याय नाही. कारण हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेचे होणारे नुकसान वाचवण्याची क्षमता ठेवतात. मात्र कस्तुरी हळद हि अशी हळद आहे जिचा आयुर्वेदामध्ये विशेष उल्लेख केलेला आहे. कस्तुरी हळदीला अनेक भागात जंगली हळद म्हणून ओळखले जाते. चला तर जाणून घेऊयात कस्तुरी हळद म्हणजे नक्की काय आणि त्यातील बहुगुणी गुणधर्म. शिवाय हि हळद आपल्या त्वचेची काळजी कशी घेते हेदेखील आपण जाणून घेणार आहोत खालीलप्रमाणे:-

० कस्तुरी हळद (जंगली हळद) म्हणजे काय?
– कस्तुरी हळदीचा (जंगली हळद) उपयोग आयुर्वेदात प्राचीन काळापासून सौंदर्य वाढवण्यासाठी केला जात आहे. हि हळद दिसायला साधारण आल्यासारखी असते. तर तिचाआतील भाग हळदीच्या रंगापेक्षा गडद असतो. तसेच कस्तुरी हळद खूपच सुगंधी आणि त्वचेच्या विकारांवर प्रभावी असते. त्वचेवरील मुरुम, सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी कस्तुरी हळद अत्यंत प्रभावी आहे. कारण कस्तुरी हळदीमध्ये अँटी-सेप्टिक, अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे सर्व गन त्वचेच्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. शिवाय, ते सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाची चिन्हे देखील कमी करतात. चला तर जाणून घेऊयात फायदे खालीलप्रमाणे:-

१) टॅनिंगवर प्रभावी – कस्तुरी हळद हि सूर्यकिरणांमुळे प्रभावित झालेल्या त्वचेवर प्रभावी काम करते. यासाठी फक्त १ चमचा कस्तुरी हळदीत मसूर डाळीची पावडर व मुलतानी माती मिसळा. आता हे मिश्रण एखाद्या स्क्रबप्रमाणे अंगावर लावा. याचा वापर आठवड्यातून दोनदा केल्यास टॅनिंग दूर होईल.

२) तेजस्वी त्वचा – जर तुम्हाला पिगमेंटेशनची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी कस्तुरी हळद फायदेशीर आहे. यासाठी १ चमचा कस्तुरी हळदीत थोडं दूध घालून हे मिश्रण १० मिनिट चेहऱ्यावर असेच ठेवा यानंतर आपला चेहरा सामान्य पाण्याने धुवा. यामूळे चेहऱ्याची चमक वाढते आणि त्वचा चमकदार होते.

३) मुरुमांचे डाग जातील – मुरुम आणि त्यांचे डाग दोन्ही इतके हट्टी असतात कि काही केल्या जात नाहीत. पण कस्तुरी हळद यावरही प्रभावी ठरते. यासाठी एका वाटीत १ चमचा कडुलिंब पावडर, थंडी मध आणि कस्तुरी हळद मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हा पॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील कोणतेही हट्टी डाग सहज दूर होतील.

४) डार्क सर्कल्स घालवा – डोळ्यांखालील काळी वर्तुळे ज्याला आपण डार्क सर्कल म्हणतो यामुळे चेहरा कोमेजल्यासारखा दिसतो. म्हणून यासाठी काकडीचे २ काप घेऊन त्यावर थोडी कस्तुरी हळद टाकून डोळ्यांवर ठेवा. असे रोज रात्री कराल तर काय बिशाद काळ्या वर्तुळाची.

५) स्ट्रेच मार्क्सवर फायदेशीर – स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी दह्यात कस्तुरी हळद, शंख पावडर मिसळा आणि प्रभावित भागावर लावा. हे मिश्रण साधारण अर्धा तास राहू द्या. यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून ३-४ वेळा या मिश्रणाचा वापर केल्यास स्ट्रेच मार्क्सची समस्या दूर होईल.

० महत्वाचे –
कस्तुरी हळद आपली त्वचा सुरक्षित व सुंदर ठेवण्यास आयुर्वेदीक मार्गातून उत्पन्न झालेला उपाय असली तरीही तुमची त्वचा संवेदनशील असल्यास याचा वापर करण्यासाठी पॅच टेस्ट जरूर करा.