आरोग्यास गुणकारी ‘कसुरी मेथी’ चमत्कारी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांच्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडणारी कसुरी मेथी अन्न पदार्थांची चव आणि त्यासोबत त्यांची पौष्टिकतादेखील वाढवते. कसुरी मेथी हि मेथीची पाने सुकवून बनविली जाते. कसुरी मेथी चवीला थोडीफार कडू असते, पण कसुरी मेथीचा उपयोग अन्नपदार्थांची चव वाढविण्यासह निरोगी आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी देखील केला जातो. कारण स्वयंपाक करण्यापासून आयुर्वेदापर्यंत कसुरी मेथीचा उल्लेख आहे. कसुरी मेथीमध्ये कॅल्शियम, आयर्न, आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराचा अनेक संसर्गांपासून बचाव होतो. याशिवाय कसुरी मेथीमध्ये हीलिंग इफेक्टस असतात ज्यांच्या सहाय्याने शरीराला आलेली सूज आणि वेदना दूर करण्यासाठी मदत मिळते. चला तर जाणून घेऊयतात कसुरी मेथीचे इतर फायदे खालीलप्रमाणे:-
१) रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकते – रक्तातील अतिरिक्त साखर दूर करण्यासाठी कसुरी मेथी खूप फायदेशीर आहे. कडवटपणामुळे हि मेथी साखर नियंत्रित करण्यास सक्षम आहे. त्यामुळे आपल्याला मधुमेहाचा त्रास असेल तर कसुरी मेथीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
२) अशक्तपणा दूर करते – दिवसभराच्या धावपळीनंतर शरीरातील ट्रेन निघून जातो आणि अशक्तपणा येतो. यावर कोणत्याही वैद्यकीय उपचारांशिवाय घरात सहजपणे ही समस्या दूर कारण्यासाठी कसुरी मेथी मदत करते. कारण कसुरी मेथीत शारीरिक थकवा घालवून अशक्तपणा कमी करण्याची क्षमता आहे. यासाठी त्याची भाजी बनवून खा वा पाण्यात भिजवून खा. अशक्तपणा दूर होईल.
३) पोटाच्या संसर्गापासून रक्षण देते – सतत पोटदुखी होत असेल तर कसुरी मेथी खा. यातील पुष्कळ पोषक तत्त्वे पोटातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास सक्षम असतात. शिवाय बर्याच आजारांपासून वाचवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे पोट, हृदय, जठर आणि आतड्यांसंबंधी कोणतीही समस्या असेल तर कसुरी मेथी खाणे लाभदायक आहे.
४) स्तनदा मातांसाठी फायदेशीर – स्तनदा महिलांसाठी कसुरी मेथी वरदान आहे. कारण कसुरी मेथीमध्ये आढळणारी पौष्टिकता स्तनदा मातांच्या दुधात वाढ करते आणि त्याचा दर्जा वाढविते. यामुळे बाळाच्या पोषणसाठी मदत मिळते.
५) कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते – कसुरी मेथी कोलेस्टेरॉल नियंत्रित करु शकते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करायचा असेल तर रोजच्या आहारात कसुरी मेथीचा समावेश करा. शिवाय इच्छा असल्यास रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी घ्या. असे काही दिवस सातत्याने केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहील.
६) वाढत्या वजनावर मात – वजन कमी करायचं असेल तर कसुरी मेथी फायदेशीर ठरते. फक्त यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या कसुरी मेथीचे सेवन करा. त्यातील फायबर त्वरीत पचत नाही आणि आपली भूक कमी करते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.