| |

बुळबुळीत असली तरी आरोग्यासाठी भेंडी बेस्ट; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन भेंडीची भाजी कोणत्याही बाजारात अगदी सहज उपलब्ध असते मात्र या भाजीची गण फोलॉइंग काही फारशी नाही. कारण भेंडीची भाजी मुळात थोडी चिकट आणि बुळबुळीत असते. यामुळे सहसा ही भाजी खणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. पण सांगायचे विशेष म्हणजे, भेंडीची भाजी भले चिकट किंवा बुळबुळीत असेल पण आरोग्यासाठी ही भाजी अगदीच उत्तम आहे. तसे पहाल तर भेंडी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागते. त्यामुळे काही लोक भेंडीचे विविध पदार्थ बनवून आवडीने खातात. लग्न किंवा समारंभात भेंडी फ्राय, भेंडी मसाला, भेंडी रायता, भरली भेंडी असे पदार्थ सर्रास दिसतात.

कोवळी भेंडी कच्ची खाल्ल्याने सुद्धा आरोग्याला फायदा मिळतो. त्यामुळे भेंडी आपण प्रत्येकाने आपल्या आहारात प्रामुख्याने खावी असे आहार तज्ञ सुद्धा सांगतात. चाला तर जाणून घेऊयात भेंडी खाण्याचे आरोग्य वर्धक फायदे कोणकोणते आहेत? खालीलप्रमाणे :-

१) रक्तातील साखरेवर नियंत्रण – भेंडीत भरपूर फायबर असते.ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते आणि रक्तातील साखर योग्य पद्धतीने शोषली जाते. परिणामी साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय भेंडीच्या भाजीमध्ये मधुमेह रोगास विरोधी गुणधर्म समाविष्ट असतात. त्यामुळे ती एन्झाइम मेटॅबॉलिक कार्बोहायड्रेट्स कमी करते आणि इन्सुलिनची निर्मिती वाढवते. शिवाय स्वादुपिंडातील बिटासेलची पुनर्निर्मिती करून इन्सुलिनचा स्राव वाढवते.

२) हृदयाचे संरक्षण – रक्तातील कोलेस्टोरॉलचे प्रमाण वाढले तर याचा थेट परिणाम हृदयावर होत असतो. परिणामी हृदयविकाराचा झटका देखील येण्याची शक्यता असते. शिवाय भेंडीत पेक्टिन हे सोल्युबल फायबर असते जे रक्तातील कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी करते आणि हृदयविकाराचा धोका टाळते. तसेच भेंडीतील पॉलिफिनोल मधील क्वेर्सेटिनमुळे कोलेस्टोरॉलचे ऑक्सिडेशन होण्यापासून बचाव होतो आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळे कमी होतात. यामुळे हृदयाचे रक्षण होते आणि त्याच्या कार्यप्रणालीत सुधार होतो.

वजन कमी करण्यास लाभदायक – वजन कमी करायचे असेल तर भेंडीची भाजी खाणे हा पर्याय अगदीच उत्तम आहे. कारण भेंडित खूप कमी कॅलरी असतात. जसे की १०० ग्रॅम भेंडीतून ३३ कॅलरी मिळतात. त्यामुळे वजन घटविण्यासाठी भेंडी नक्कीच फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ – भेंडीत व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण अधिक असते. उदाहरणात सांगायचे तर १०० ग्रॅम भेंडीतून दररोजच्या शारीरिक गरजेनुसार ३८% व्हिटॅमिन ‘सी’ मिळते. परिणामी व्हिटॅमिन ‘सी’मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारांपासून आपले संरक्षण होते.

मेंदूच्या कार्यप्रणालीत सुधार – भेंडीत फोलेट आणि व्हिटॅमिन ‘बी९’ हा पोषक घटक समाविष्ट असतो. याचा फायदा मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी होतो. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत सुधार होतो.

कॅन्सरपासून संरक्षण – भेंडीमध्ये इतर भाज्यांपेक्षा अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात. यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट होतात. याशिवाय भेंडीतील सोल्युबल फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे आतड्यांच्या कॅन्सरची शक्यता कमी होते.