| | |

जाणून घ्या बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे प्रकार आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा अनेक लोकांकडून आपल्या आहारामध्ये ऑलिव्ह ऑईलचा वापर करा असा सल्ला तुम्हाला मिळत असेल. मात्र जे कधी खाल्लं नाही, माहित नाही त्याचा एकदम जेवणार वापर करायचा म्हणजे..? मग तुमच्या मनात अनेको शंका कुशंका घर करू लागतात आणि तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर टाळता. अनेकदा डॉक्टरसुद्धा हेच तेल खाण्याचे निर्देश देतात. कारण ऑलिव्ह ऑईलमध्ये शरीर, केस आणि अगदी त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणारे सर्व घटक समाविष्ट असतात. हे तेल ऑलिव्ह फळापासून काढले जाते. या तेलाचे अनेक प्रकार आणि आरोग्यास लाभ देणारे फायदे आहेत.

० ऑलिव्ह ऑईलचे प्रकार

१) व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल – व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल हे तेल कोल्ड प्रोसेस पद्धतीने काढलेले नसते. त्यामुळे ऑलिव्हची सर्व सत्त्व यामध्ये आढळत नाहीत. त्यामुळे हे तेल चेहऱ्यावर किंवा शरीराला लावण्यासाठी वापरण्यापेक्षा रोजच्या जेवणात वापरावे.

२) एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल – हे तेल कोल्ड प्रोसेस पद्धतीने काढलयामुळे हे तेल शुद्ध आणि महाग आहे. मंद आचेवर जेवण शिजवण्यासाठी या तेलाचा वापर करावा.

४) रिफाईन्ड ऑलिव्ह ऑईल – हे तेल ऑलिव्हवर कोल्ड प्रोसेस झाल्यानंतर केमिकल प्रक्रियेतून काढले जाते. यामध्ये उष्णता आणि फिल्ट्रेशन प्रोसेसचा अधिक समावेश असतो. त्यामुळे रिफाईन्ड तेलात अॅसिडीक पातळी आढळते. ज्यामुळे हे तेल जास्त टीकते.

५) ब्लेंडेड ऑलिव्ह ऑईल – हे रिफाईन्ड ऑलिव्ह ऑईल आणि व्हर्जिन प्रोडक्शन ऑईलचे मिश्रण असते.

३) पोमास ऑईल – ऑलिव्ह फळातील तेल काढून झाल्यावर उरलेल्या चोथ्यातून काढण्यात आलेल्या तेलाला पोमास ऑईल म्हणतात. हे तेल साधारणतः जेवण बनवण्यासाठी वापरले जाते.

० ऑलिव्ह तेलाचे फायदे

१) डायबेटीसवर नियंत्रण – ऑलिव्ह ऑईल हे फॅट्सविरोधी असते. यामुळे तुमच्या रोजच्या डाएटमध्ये ऑलिव्ह ऑईलचा समावेश असल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते परिणामी डायबेटिसवर नियंत्रण मिळवता येते.

२) डिप्रेशन – ऑलिव्ह ऑईल तुमच्या मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवतं, हे रसायन तुमच्या मूडवर परिणाम करतं. त्यामुळे ऑलिव्ह ऑईलचं नियमित सेवन केल्यास तुमचं एकूणच मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

३) अल्झायमरपासून रक्षण – अमेरिकन तज्ज्ञांच्या संशोधनात, उंदरावर एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईलच्या माध्यमातून परीक्षण केले असता त्याची बुद्धी वाढल्याचे निदारहणास आले. या थिअरीनुसार अल्झायमरच्या रुग्णांनी ऑलिव्ह ऑईलचे सेवन केल्यास त्यांचे या रोगापासून रक्षण होईल.

४) बद्धकोष्ठत्यापासून आराम – ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमीन ई, क, लोह, ओमेगा- ३, ६ फॅटी अॅसिड्स, अँटी ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता असल्यास दिवसातून २ वेळा १ चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल रिकाम्या पोटी घेतल्यास हि समस्या दूर होते. या तेलाचे सेवन करण्याआधी ४ तास काहीही खाऊ नये, याची काळजी घ्या.

५) ब्रेस्ट कॅन्सरपासून रक्षण – ओल्युअरपेन या ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक घटकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरपासून रक्षण करण्याची क्षमता असते. .

६) ऑस्टिओपोरॉसिस – ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणारा ऑस्टीओकॅल्सीन घटक हाडं बळकट करतो. त्यामुळे नियमित ऑलिव्ह ऑईलचे सेवन केल्यास ऑस्टिओपोरॉसिस होण्याचा धोका नसतो.

७) हाय ब्लडप्रेशर – ऑलिव्ह ऑईलमधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्समुळे यात फॅटी अॅसिड ओमेगा – ३ असते आणि यामुळे ब्लड प्रेशर कमी होते.

८) कॉलेस्ट्रॉल – ऑलिव्ह ऑईलमध्ये ७५% ते ८०% प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड फॅट असते. जे चांगलं कॉलेस्ट्रॉल आणि एचडीएल राखण्यास मदत करते. त्यामुळे भविष्यातील हृदयविकाराचा धोका टळतो आणि वजनही नियंत्रणात राहते.