| |

बिल्वपत्र घेई सौंदर्याची काळजी; कशी ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बेल ही एक वनस्पती असून ती अत्यंत गुणकारी आहे. कारण बेलाचे पान, फळ आणि खोडसुद्धा अगदी जुन्यातल्या जुन्या रोगावर अतिशय प्रभावी औषधी आहे. यातील अँण्टी ऑक्सिडंट्स सर्वात अधिक बिल्वपत्रांमध्ये आढळतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी बिल्वपत्राचा उपयोग प्रभावी ठरतो. तसेच केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी बिल्वपत्र उपयोगी ठरते. चला तर जाणून घेऊयात हे बिल्वपत्र आपल्या सौंदर्याची काळजी कसे घेते. खालील प्रमाणे:-

१) निरोगी केस आणि तजेलदार त्वचा
– केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आपल्या त्वचेला तजेलदार आणि नैसर्गिक चमक मिळवून देण्यासाठी बिल्वपत्रातील सर्व घटक कार्यरत असतात. यात बीटा कॅरेटीन, थायमीन, प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन्स ए, बी आणि सी तसेच अँण्टी ऑक्सिडंट्स याचा भरपूर प्रमाणात समावेश होतो.

२) त्वचा नितळ आणि कोमल होते.
– बेलपत्रांचा लेप तर त्वचेसाठी अतयंत फायदेशीर असतो. यामुळे त्वचा अतिशय कोमल आणि नितळ होते. या उपायासाठी बेलाची पाने मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा. हा रस साधारण २ चमचे घेऊन त्यात १ चमचा मध घालून हे मिश्रण एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा. पुढे १५ ते २० मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. या उपायाने चेहऱ्यावरील पुरळदेखील कमी होतात आणि चेहरा डागरहित होतो.

३) केसगळती थांबते.
– केसांची चांगली वाढ होण्यासाठी बेलाच्या पानांचा रस केसांना लावणे किंवा नुसते १ पान चावून खाणे फायद्याचे ठरते. यामुळे केस सुंदर लांबसडक दिसतात. तसेच केसांची गळती थांबवण्यासाठी तिळाच्या तेलात बेल फळाची साल आणि थोडा कापूर घालून हे तेल गरम करून घ्या. यानंतर हे तेल रोज केसांना लावा. यामुळे केसांचे गळणे थांबेल. तसेच केस धुण्याआधी अर्धातास बेलपानांचा रस केसांना लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने केस धुतल्याने केस लांबसडक होतात.

० याव्यतिरिक्त बेलाच्या पानांचा अन्य उपयोग कसा कराल?
४) बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने पोटदुखी आणि अपचनाच्या तक्रारी कमी होतात.

५) मधुमेहींनी साखर नियंत्रित ठेवण्यासाठी बेलफळाचे चुर्ण खाणे फायद्याचे ठरते.

६) व्हायरल इन्फेक्शनमुळे येणार ताप घालविण्यासाठी बेलाची पाने ग्लासभर पाण्यात उकळून उकळून पाणी निम्मे करून घ्यावे आणि ते गाळून गरम असतानाच प्यावे.

७) उष्णतेचा त्रास जाणवत असल्यास २ चमचे बेलाचा रस गरम पाण्यात मिसळून प्यावे.