Learn the benefits of applying turmeric cosmetics in winter
|

हिवाळ्यात हळदीचे उटणे लावण्याचे फायदे जाणून घ्या

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । हळद हि आपल्या आहारात खूप महत्वाची भूमिका बजावते. आहारात हळदीचा वापर हा जास्त प्रमाणात केला पाहिजे. हळद हि खूप महत्वाची भूमिका बजावते. डाग जर चेहऱ्यावर नसतील तर ती त्वचा आपल्याला सर्वानाच आवडते. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जर जास्त केमिकल चा वापर करत असाल तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. हळदीला आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्व आहे. हळद हि आपल्या त्वचेबरोबर आपल्या आहारात पण जास्त लाभकारी आहे. त्वचेसाठी चमकणाऱ्या टॉनिक प्रमाणे हळद आपल्या शरीराला लाभकारी आहे.

ज्या लोकांची त्वचा हि फार तेलकट कोरडी किंवा संवेदनशील असते. त्या लोकांनी आपल्या त्वचेवर हळदीचे मालिश केले जावे. हि हळद ही आरोग्यासह त्वचेसाठी देखील अतिशय गुणकारी मानली जाते. हिवाळ्याच्या दिवसात आपल्या त्वचेसाठी कश्या पद्धतीने ठरू शकतो हे जाणून घेऊया ….

—- हळदीचे गुणधर्म

हळदीमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अँटी बॅक्टेरिया आणि अँटी फंगल घटक असतात. जे शरीरास रोगांशी लढण्याची शक्ती देतात. या शिवाय या मध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, आयरन, मॅग्नेशिअम, झिंक या सारखे पोषक घटक आढळतात. हळदीमध्ये अँटिसेप्टिक हे गुण असतात. त्यामुळे चेहऱ्यावर पडणारे डाग हे कमी होण्यास मदत होते. हळदीच्या पावडर मध्ये काही प्रमाणात लिंबू आणि चंदन याचे ठराविक प्रमाण ठेवावे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग हे पूर्णतः कमी होण्यास मदत होऊ शकतो.

हळदीचा पॅक लावल्याने कमी होतात आपण दोन चमचे हरभराच्या डाळीच्या पिठात अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे ताजे दही मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुऊन घ्या. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला खूप छान असा ग्लो येतो. तुम्ही हळदीच्या पावडर मध्ये काही प्रमाणात डाळीचे पीठ घालून आणि दही घालून त्याचा वापर आपल्या चेहऱ्यावर करा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची रक्ताभिसरण क्रिया हि व्यवथित राहण्यास मदत होते. नंतर कोमट पाण्याने धुवून तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता . चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हळद,तांदुळाची पिठी, कच्चं दूध आणि टोमॅटोचे रस मिसळून लावा आणि अर्धा तास तसेच ठेवा. या नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.