| |

ड्रॅगन फ्रूटचे फायदे जाणून घ्या आणि मिळवा हे लाभ; वाचा सविस्तर

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याला निरोगी आरोग्य जगायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी. यासाठी आपल्याला आपली जीवनपद्धती आरोग्याच्या दृष्टीने थोडी सुधारायला हवी. जसे कि या दरम्यान आपल्या खाण्यापिण्याच्या सर्व बाबतीत आपल्याला काय खायचं यापासून किती खायचं आणि कधी खायचं या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवा. आपल्या आहारात सर्व पोषक तत्त्वे समाविष्ट करण्यासाठी आपल्याला फाळांचेदेखील सेवन करणे आवश्यक आहे. यामध्ये ड्रॅगन फ्रुट आपल्या शरीरासाठी खुप लाभदायक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ड्रॅगन फ्रूटची लोकप्रियता वाढत चालली आहे.

ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि अगदी वाईनसुध्दा बनवता येते. पण या फळाचा वापर केवळ शरीराची काळजी घेणे नव्हे तर सौंदर्याची काळजी घेण्यासाठीसुद्धा होतो. कारण अनेको सौंदर्य प्रसाधनामध्ये या फळाचा वापर केला जातो. जसे कि – फेस पॅक, स्क्रबर, फेशिअल क्रीम. सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, व्हिएतनाम, इस्त्राईल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते. चला तर जाणून घेऊयात ड्रॅगन फ्रूटचे फायदे कोणते ते खालीलप्रमाणे:-

० ड्रॅगन फ्रुटचे ‘हे’ फायदे

१) हृदयाची काळजी – ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते. शिवाय धमन्या आणि नसांमध्ये प्लाक जमा झाल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याचा धोका असतो हा धोका पम ड्रॅगन फ्रुटमधील पोषक तत्वांमुळे कमी होतो.

२) सांधेदुखीपासून आराम – ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅल्शिअम अधिक असतं. जे शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी मदत करते. त्यामुळे सांधेदुखीवर ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. तसेच यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होण्यासाठी मदत होते.

३) केसांसाठी लाभदायक – ड्रॅगन फ्रुट केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही फायदेशीर असतं. बऱ्याचदा अनेक लोकं केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी केसांना कलर करतात. परंतु कलरमधील केमिकल्समुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यांपासून केसांचा बचाव करण्यासाठी ड्रॅगन फ्रुटमधील पोषक तत्व मदत करतात.

४) त्वचेला फायदेशीर – ड्रॅगन फ्रुट त्वचेच्या समस्यांवरही फायदेशीर असतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंटचं प्रमाण अधिक असतं. तसेच व्हिटॅमिन सी त्वचेसाठी चांगलं असतं. त्यामुळे त्वचा मुलायमही होते.