Learn the benefits of drinking Nira in the growing summer

जाणून घ्या , वाढत्या उन्हाळ्यात नीरा पिण्याचे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । भारतात नीरा हे पेय शीतपेये म्हणून ओळखले जाते . शीतपेयांचा वापर आपल्या आहारात केल्याने आपल्याला ताजेतवाने वाटण्यास मदत होते . नीरा हि माडाच्या किंवा शिंदीच्या झाडापासून बनवली जाते . नीरेचे उत्पन्न हे सर्वात जास्त कोकण भागात केले जाते . कारण त्या भागात ताडाच्या झाडांची संख्या हि जास्त आहे. कोवळ्या कोवळ्या झाडापासून बनवली गेलेली नीरा आरोग्य दृष्टीने खूप फायदेशीर आहे .

ताड , माड, शिंदी अश्या झाडापासून नीरा हि सूर्योदयापूर्वी काढली जाते . झाडाला अडकवलेल्या मडक्यामध्ये नीरा साठवली जाते . जर मधुर अश्या निरेवर जर सूर्यकिरणांचा प्रभाव पडला तर ती आंबण्याची सुरुवात होते. नीरा आंबली गेली तर मात्र ते पिण्यायोग्य राहत नाही. ज्यावेळी नीरा आंबली जाते . त्यावेळी त्याचे रूपांतर ताडीमध्ये होते. ताडी हि पिण्यासाठी अजिबात योग्य नसते. ताडीमध्ये रुपांतर झाल्यानंतर त्याच्यातले मौल्यवान घटक हे दूर होण्यास सुरुवात होते . निरेचा वापर हा तहान भागवण्यासाठी केला जात असे. पण आजकल बाजारात मोठया प्रमाणात वेगवेगळ्या शीतपेयांचा वापर करत असल्याने नीरा विक्री केंद्र कमी कमी झाली आहेत . अनेक ठिकाणी नीरेचे उत्पन्न घेण्यासाठी माडाच्या झाडांची लागवट केली जाते.

नीरेमधल्या घटकांचा वापर हा शाळेतील मुलांसाठी किती प्रमाणात करू शकतो हे पाहण्यासाठी निरेचा वापर हा काही ठराविक मुलांच्यावर करण्यात आला होता. नीरा हि साधारण पणे पाड्यांवर राहत असलेल्या आदिवासी मुलांना देण्यात आली होती. पण नीरेचे खूप चागल्या पद्धतीचे परिणाम हे मुलांच्या आरोग्यावर झालेले लक्षात आले . मुले पाड्यावर राहत असल्याने मुलांच्या शरीरावर अनेक डाग , जंतुसंसर्ग झालेले होते . ते दररोज नीरा पिण्याचे त्याच्या शरीरावरील नायटा आणि डाग यांचे प्रमाण कमी झाले .