| | |

हृदयाची अनियमित धडधड आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीरातील सगळ्यात लहान पण अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आपले हृदय. हा अवयव अव्याहतपणे आपल्या शरीरात धडधडत असतो. पण त्याची धडधड आपल्याला जाणवत नाही. अतिव्यायाम, काळजी, चिंता, क्रोध अशा मानसिक भावना प्रस्थापित झाल्यास मात्र हृदयाची धडपड वाढते आणि जाणवते. मित्रांनो, हृदयाच्या ठोक्याची प्राकृत गती हि साधारण ६५ ते ८० पर्यंत असते. ती ६० पेक्षा कमी वा ८५ – ९०च्या पुढे जाणे याला हृदयाची अनियमित गती असे म्हणतात. मात्र या स्थितीमुळे आरोग्यात बिघाड होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशी स्थिती आढळल्यास वेळीच उपचार घेणे आवश्यक असते. चला तर जाणून घेऊयात या स्थितीची लक्षणे, कारणे आणि उपाय खालीलप्रमाणे:-

लक्षणे – हृदय धडधडण्याची संवेदना हृदयाच्या वरच्या भागात निर्माण होऊन हृदयात पसरते. ह्या भागात काही कारणाने बिघाड झाल्यास हृदय हे प्राकृत गतीपेक्षा हळू किंवा जलदरीत्या धडधडते. यामुळे शरीरात रक्तपुरवठा होण्याच्या कामात अडसर येते. दरम्यान खालील लक्षणे आढळतात.

१) घाबरल्यासारखे वाटणे.

२) चक्कर येणे.

३) नाडीचा ठोका चुकणे/ नाडीचे बल कमीजास्त होणे.

४) अस्वस्थता वाढणे.

५) छातीत कळ येणे.

कारणे – आयुर्वेद सांगते कि या स्थितीदरम्यान वाताचा प्रकोप निर्माण होतो. यामुळे त्रास वाढतो. दरम्यान वात वाढण्यास मुख्य दोन कारणे असतात.

अ) धातुक्षीणता – शरीरासाठी आवश्यक पदार्थाची कमतरता निर्माण होणे.
– रसधातू कमी होणे म्हणजे शरीरात कोरडेपणा येणे. अंत:स्रावी ग्रंथीचे(हार्मोन्स) स्राव जीवनसत्त्वे, क्षार, खनिजे ह्यांना एकत्रितपणे रसधातू म्हणतात. जसे – पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक १२, vita, vite ह्यांची कमतरता असणे. हार्मोन्सचे असंतुलन रजोनिवृत्तीच्या काळात तसेच थायरॉइडच्या स्रावाचे असंतुलन ह्यामुळे हृदयात धडधड होते. याशिवाय रक्तधातू कमी असणे ह्यामुळेही हृदयाची धडधड होते.

ब) स्रोतरोधजन्य वातप्रक्रोप (मार्गाविरोध) – वाहिन्यांमधला अडथळा.
– मधुमेह, अतिरक्तदाब ह्यामुळे येणारे धमनी काठिण्य, रक्तातील गुठळी, आमवात वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण, हृदयविकाराचा झटका ह्या कारणांमूळे हृदयगती अनियमित होते.

उपाय – योगसने प्राणायाम, ध्यानधारणेची चांगली मदत होते. मन आनंदी ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे

१) तत्कालीन उपचार
– हृदयाची अनियमित गती सुधारण्यासाठी आयुर्वेदात परिणामकारक औषधे नमूद केलेली आहेत. त्याचबरोबर रुग्णाचे घाबरलेले मन शांत करण्यासाठी ठेखील औषधे दिली जातात. औषधी तेलांचे हृदयबस्ती अर्थात हृदयाच्या जागी तेल भरणे हा यावरील मुख्य उपाय आहे. हा उपाय ताबडतोब परिणाम दर्शवितो.

२) आजार बरा होण्यासाठीचे उपचार
– आंबट गोड फळे वातशमन करतात. त्यामुळे पुढील फळे खावीत. डाळिंब, मनुका, नारळ, द्राक्षे, संत्री, मोसबी, बोरे. याशिवाय खजुराचे सरबत, लिंबू सरबत, आवळा (मोरावळा) खावा.

३) आयुर्वेदात अभ्रक, अर्जुन अशी काही द्रव्ये तसेच इतर वनस्पती व भस्म हदयावर परिणामकारक आहेत.

४) आहारात बदल करणे देखील यावर प्रभावी आराम देते.

५) अतिमद्यपान टाळावे.

६) पंचकर्म चिकित्सा करणे.

७) नियमित व्यायाम आणि योग्य करणे.