| | |

रात्री झोपण्याआधी नाभीत तेल सोडा आणि आरोग्यदायी लाभ मिळवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बदलती जीवनशैली आणि ढासळते आरोग्य यांचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. एक छोटंसं आजारपण कधी मोठं होतं ते कळत नाही. इतकंच काय तर यांवर आपण कित्येक विविध प्रकारची औषधे घेतो. त्याचवेळी, दुसरीकडे पाहाल तर रोग टाळण्यासाठी घरगुती उपचार खूप प्रभावी सिद्ध झाल्याचे समोर येत आहे. यापैकी एक प्रभावी उपाय म्हणजे नाभीत अर्थात बेंबीत तेल ओतणे. यामुळे आपले शरीर निरोगी राहीलच यासह अनेक रोग आपल्यापासून दूर राहतील. याचे कारण म्हणजे, पेकोटी नावाची ग्रंथी नाभीच्या मागे सापडते. जी शरीराच्या इतर अवयव, ऊती आणि नसांसह जोडलेली असते. ज्यामुळे आपण बेंबीत तेल सोडलयास पेकोटी ग्रंथी पटकन शोषून घेते आणि यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्ती मिळते. चला तर जाणून घेऊयात नाभीत कोणते तेल कसे सोडावे आणि यामुळे कोणते फायदे होतात खालीलप्रमाणे:-

० नाभीत कोणते तेल घालावे?
– नाभीमध्ये मोहरीचे तेल, ऑलिव्ह, नारळ, बदाम आणि कडुनिंब यांचे तेल घालू शकता. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास शुद्ध तूपदेखील घालू शकता.

० नाभीत तेल घालण्याची पद्धत
– वरीलपैकी कोणतेही एक थोडेसे तेल घ्या आणि नंतर नाभीत हळुवार याचे थेंब सोडा. या व्यतिरिक्त आपण इच्छित असल्यास कापूस वापरू शकता. सुमारे एक तास तेलात भिजवलेला कापूस बेंबीत ठेवल्यानंतर तो बाहेर काढा.

० नाभीत तेल सोडण्याचे फायदे

१) पोटाची समस्या – पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास नाभीत तेल सोडणे फायद्याचे ठरते. अपचन, अन्न विषबाधा, अतिसार यासारख्या समस्येने ग्रस्त असल्यास, पेपरमिंट आणि आल्याचे तेल इतर कोणत्याही तेलासोबत मिसळून पातळ करा. हे तेल नाभीमध्ये घाला आणि तासभर निपचित पडून रहा. यानंतर उपडी होऊन तेल काढून टाका. यामुळे पोटाला आराम मिळतो. तसेच पचन तंत्र मजबूत करण्यासाठी मोहरीचे तेल वापरा.

२) गुडघेदुखीपासून आराम – जर गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला वारंवार जाणवत असेल तर यासाठी मोहरीचे तेल गॅसवर मंद आचेवर हलके गरज करा आणि कोमट होताच नाभीत सोडा. हि क्रिया दररोज आठवडाभर केल्यास आराम मिळेल.

३) वजन कमी करा – वजन कमी करायचे असेल तर रात्री झोपेच्याआधी नाभीमध्ये ऑलिव्ह ऑईल टाका. यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी विरघळू लागते.

४) चमकदार त्वचा – आपली त्वचा नितळ, कोमल आणि नैसर्गिकरित्या चमकावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी न चुकता दररोज रात्री झोपण्याआधी नाभीत बदाम तेल घाला.

५) मुरुमांपासून मुक्तता – चेहऱ्यावर खूप मुरुम असतील आणि ते नैसर्गिक मार्गाने मुक्त करायचे असतील तर दररोज नाभीत कडुनिंबाच्या तेलाचे काही थेंब घाला. याशिवाय मोहरीचे तेल देखील वापरता येते.

६) मुलायम ओठ – ओठ फाटणे, जखम होणे, ओठाची त्वचा निघणे या समस्यांवर मात करायची असेल तर यासाठी नाभीमध्ये मोहरीचे तेल टाका. यामुळे फाटलेले ओठ मऊ होतील आणि सुंदरही दिसतील.

७) प्रजनन क्षमता – दररोज रात्री झोपण्याआधी नारळ तेलाचे ५-६ थेंब नाभीमध्ये टाकल्यास प्रजनन क्षमता वाढते.

० महत्वाचे
– एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असेल तर तो पदार्थ वापरणे टाळा.
– कोणताही संबंधित आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे उपाय करू नयेत.