| | | |

हिवाळ्यात हवा गवती चहाचा उकाळा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता हिवाळा सुरु झाला आहे. यामुळे हळू हळू थंडी जाणवू लागली आहे. अश्या दिवसांमध्ये दिवस लहान होतो आणि अख्खा दिवस हवेत हलका गारवा असतो. दरम्यान दुपारच्यावेळी कडक ऊन आणि संध्याक झाली का मग हुडहुडी भरेल अशी थंडी. यामुळे हिवाळा सुरु झाला की, अनेकांना सर्दी, खोकला असे आजार सुरु होतात. हे आजार मौसमी असल्यामुळे अनेकदा यावर कितीही औषधांचा भडिमार केला तरी देखील सर्दी, खोकला काही लगेच बरा होत नाही. मात्र, त्या अँटिबायोटिकबरोबर काही आयुर्वेदिक औषधांचा वापर केला तर लवकर आराम मिळतो आणि चांगला फायदादेखील मिळतो. यामध्ये गवती चहा एक महत्त्वाचा ठरतो.

गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण, गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. यासह अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक हे गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात. शिवाय पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात. यामुळे संसर्गजन्य कोणत्याही आजारावर मात करायची असेल आणि प्रामुख्याने मौसमी आजारांवर मात करण्यासाठी गवती चहाची एक उकळी काफी है! जाणून घ्या गवती चहा कसा बनवालं आणि त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

० गवती चहा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
– पाणी
– लिंबू
– मध

० कृती – सर्वात अगोदर गवती चहा धुवून घ्या. यानंतर पॅनमध्ये पाणी गरम करावे. आता त्यात गवती चहा आणि लिंबाचे तुकडे घाला. 10 मिनिटे उकळी येऊ द्या. नंतर चहा एक चमचा मध घाला. आता हा चहा गरम सर्व्ह करा.

० फायदे –

१) ताप – बऱ्याचदा पाऊस आणि थंडी या दोन्ही मोसमात ताप हा अगदी सर्वसामान्य आजार आहे. त्यात एकदा का ताप आला की, तो सहजासहजी जात नाही. यानंतर ताप गेला तरी अंग मोडून येते. अशावेळी अंगातून येणारा घाम अधिक प्रमाणात येणे फायद्याचे असते. त्यासाठी ताप आलेल्या व्यक्तीने गवती चहा घातलेल्या चहाचे सेवन करणे फायद्याचे ठरते. यामुळे खूप घाम येतो आणि ताप उतरतो.

२) अशक्तपणा – लिंबू आणि गवती चहा घेण्याने शारीरिक थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. त्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म आहेत. जे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण करते. परिणामी थकवा निघून जातो आणि ऊर्जेचा साठा कायम राहतो.

३) उलट्या, जुलाब – एखाद्या व्यक्तीस उलट्या किंवा जुलाब होत असतील तर, त्या व्यक्तीने गवती चहाचे सेवन करणे लाभदायक ठरते. कारण, यामुळे उलट्या, जुलाब थांबण्यास मदत होते.

४) जुनाट सर्दी – गवती चहा, पुदिना, दालचिनी, आलं हे सर्व जिन्नस सम प्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा तयार करावा. हा काढा अर्धा कप प्रमाणात रोज रात्री प्या आणि ऊबदार कपडे, पांघरुण घेऊन झोपा. यामुळे जुनाट सर्दी असो नाहीतर पडसे कमी होणार म्हणजे होणारच.

५) पोटदुखी – अजीर्णामुळे, अपचनामुळे अचानक पोटदुखी उदभवली तर उत्तम घरगुती उपाय म्हणून गवती चहाच्या तेलाचे दोन थेंब बत्ताशावर टाकून खा. यामुळे लगेच आराम मिळेल आणि पोटदुखी थांबते.

६) सांधेदुखी – सांधेदुखी, सांध्यांतून कट कट आवाज होणे, सांध्यांना सूज येणे या तक्रारींवर अत्यंत उत्तम असा घरगुती उपाय म्हणजे गवती चहाचे तेल चमचाभर घेऊन त्यात दोन चमचे खोबरेल तेल मिसळून गरम करा. यानंतर त्यात एक कापराची वडी टाकून या तेलाने सांध्यावर मालिश करा आणि शेका. यामुळेतवारीत सांधेदुखी दूर होण्यास मदत होते.

७) वजन कमी होते – गवती चहाच्या वाफेने दररोज शेक घेतल्याने भरपूर घाम येतो. यामुळे अतिरिक्त चरबी जळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.