Benefits Of Lemon Water
| | |

Lemon Water Benefits: आंबट गोड लिंबू पाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। लिंबाचा आंबट गोड चटकदारपणा जिभेला हवाहवासा वाटतो. त्यात रखरखीत ऊन असेल तर लिंबू पाण्याला पर्याय नाही. पण फक्त उन्हाळ्यासाठी नाही तर हे लिंबू पाणी आरोग्यासाठी इतरही उत्तम फायदे देते. त्यामुळे आज आपण या बातमीतून लिंबू पाण्याचे अन्य फायदे सविस्तर जाणून घेणार आहोत. (Lemon Water Benefits)

(Lemon Water Benefits)

सध्या वाहत्या वाऱ्यातील वाफा हेच सांगतात कि कडक उन्हाळा सुरु झाला आहे. साधारण एप्रिल – मे या महिन्यांच्या आसपास उन्हाचे चटके लागतील इतका सूर्य तापलेला असतो. घरातून बाहेर पडायचं म्हटलं कि नकोच वाटत. पण दैनंदिन जीवनशैली घरातून बाहेर पडायला भाग पाडते आणि मग आरोग्याचे नुकसान होते. अशा दिवसात शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते. यामुळे साहजिकच बॉडी डिहायड्रेट होते. परिणामी विविध आरोग्यविषयक समस्या जाणवतात.

त्यामुळे कडकडीत उन्हात जर डोळ्यासमोर लिंबू पाणी दिसलं तर ते पिण्याचा मोह आवरता येत नाही. हे लिंबू पाणी शरीराला गारवा देत. जर तुम्हाला वाटत असेल कि लिंबू पाणी फक्त एवढ्यापुरताच फायदेशीर आहे. तर तुम्ही चुकीचे आहात. लिंबू पाण्याचे अनेक फायदे आहेत जे अनेकांना माहित नाहीत. (Lemon Water Benefits)

कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. लिंबाचे ईडलिंबू आणि कागदी लिंबू असे दोन मुख्य प्रकार आहेत. यातील कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. या लिंबापासून सरबत, लोणचे, मॉकटेल बनविले जाते. सायट्रस कुळातील हे फळ अतिशय उपयुक्त असून आरोग्यदायी मानले जाते. ताजेपणा देणारा, तोंडाची रुची वाढविणारा, आजारपण दूर करणारा हा लिंबू मूळ भारतीयच आहे.

(Origin Of Lemon) हडप्पा येथील उत्खननात सापडलेल्या अवशेषामध्ये लिंबाच्या पानांचा वापर केल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्राचीन काळातदेखील भारतात लिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता हे सिद्ध होते. या प्राचीन काळात लिंबू पाण्यात मिसळून त्याचे सेवन केले जायचे. यामुळे एक वेगळीच उर्जा, वेगळी चव मिळत असल्याचा यात उल्लेख केला आहे. हे पेय म्हणजेच आपले आंबट गोड चवीचे लिंबू पाणी/ सरबत.

इतकेच नव्हे तर मुघलांच्या काळात जे प्रवासी आले होते अगदी त्यांनीदेखील आपल्या प्रवासवर्णनात लिंबाचा आणि लिंबू पाण्याचा उल्लेख केला आहे. तसेच चरक संहितेत लिंबाचे उपयोग नोंदवलेले आहेत. लिंबाची विशेष बाब म्हणजे शाकाहारी असो किंवा मांसाहारी अश्या कुठल्याही पदार्थात याचा वापर होतो. अगदी सरबतापासून सोडा, मद्य यात लिंबाचा स्वाद विशेष पसंतीचा आहे.

० लिंबाचे औषधी गुणधर्म (Lemon Medicinal Properties)

लिंबामध्ये ए, बी, सी जीवनसत्व असण्यासोबत पोटॅशियम, मँगनीज, आयर्न, तांबे, फॉस्फरस अशी अनेक क्षार आहेत. तसेच यात प्रोटीन आणि कर्बोदकेसुद्धा आहेत. यामुळे लिंबाचा अनेक आजारांवर औषधी पर्याय म्हणून उपयोग होतो. पचन व्यवस्थित होण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे.
 (Lemon Water Benefits) तर तोंडाची चव गेल्यास ती पुन्हा आणण्यासाठी लिंबू लोणचे खाल्ले जाते. 
तर सर्दी, रक्तक्षय, पचन विकार, उष्णता शमन अश्या अनेक आजारात लिंबाचे सेवन फायद्याचे ठरते. कारण लिंबू शुक्राणू मारते. अगदी एचआयव्ही विषाणू सुद्धा लिंबामुळे मरतात. या गुणधर्मांमुळे लिंबाचा वापर गर्भनिरोधक म्हणून देखील केला जातो. एका ऑस्ट्रेलियन संशोधकाने लिंबातील हे गुण अभ्यासाद्वारे तयार केलेल्या रिपोर्टमध्ये सांगतिले आहेत.

लिंबू पाण्याचे इतर फायदे (Lemon Water Benefits)

1. रोग प्रतिकारशक्ती वाढते

Immunity
Immunity

लिंबु हे व्हिटॅमिन-सी समृद्ध फळ असल्यामुळे याचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती (Immunity Booster) वाढते. त्यामुळे लिंबाच्या रसाचे मधासह सेवन केलात तर आजारपण कमी येईल हे तुमच्या निदर्शनास येईल. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर रहायचे असेल तर आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे सेवन करा.

2. ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात

high BP
Blood Pressure

उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त असाल तर फक्त लिंबू आणि पाण्याचे सेवन करा. याशिवाय लेमन टी पिणे देखील फायदेशीर राहील. कारण लिंबू पोटॅशियम समृद्ध आहे. यामुळे लिंबाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबची (High Blood Pressure) समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.

3. पचन प्रणालीत सुधार

Digestion
Digestive System

लिंबाचा रस पचन प्रणाली (Digestive System) बळकट करतो. यामुळे १ ग्लासभर लिंबाचे सरबत प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि पोट संबंधित अनेक आजार दूर होतात. ज्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते.

4. रक्त शुद्धीकरण

Blood
Blood Cleaning

लिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट शरीरातील रक्त शुद्धी (Blood Cleaning) करण्याचे कार्य करत असतात. यामुळे जेवणानंतर १ ग्लास वा १ वाटी लिंबू पाणी प्यायल्यास फायदा होतो.

5. वजन कमी होते

Weight Loss
Weight Loss

सकाळी उपाशी पोटी लिंबू सरबत प्यायल्याने वजन नियंत्रित राहते. (Weight Loss) यासाठी सकाळी लिंबाचे ६ ते ७ थेंब कोमट पाण्यातून घ्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. परिणामी शरीर निरोगी राहते.

6. ताप होईल दूर

Viral Fever

व्हायरल इन्फेक्शनमूळे (Viral Fever) ताप आल्यास लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कारण लिंबातील व्हिटॅमिन सी हे जीवाणू नष्ट करण्यात मदत करते आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. ज्यामुळे ताप अथवा किरकोळ संसर्ग होणारे आजार टाळता येतात.

7. त्वचेच्या समस्यांपासून सुटका

Skin Disease

लिंबाच्या रसातील नैसर्गिक अँटी सेप्टिक गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करते. (Skin Disease) सनबर्नची वेदना असो वा मधमाशीच्या डंकांपासून होणारी जळजळ अशा प्रत्येक समस्येपासून लिंबू आराम देतो. तसेच लिंबातील अँटी एजिंग गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि ब्लॅकहेड्स दूर करतात.

Lemon Water

० आरोग्यदायी फायद्यांसाठी लिंबू पाणी कधी आणि कसे प्यावे ? (How To Drink Lemon Water)

लिंबू पाणी (Lemon water) बनविताना साखर मिठाचा अतिवापर करू नये. शक्यतो विना मीठ विना साखर हे पेय प्यावे आणि लिंबू पाण्यासाठी वापरले जाणारे पाणी अति थंड किंवा अति गरम असू नये. तज्ञ सांगतात कि, आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता दिवसातून दोनदा लिंबू पाणी पिऊ शकता. हे आरोग्यासाठी अधिक लाभदायक आहे. त्यामुळे एकवेळ सकाळी आणि एकवेळ दुपारी या पेयाचे सेवन करावे.

सकाळी – नियमित सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय पचन प्रणाली सुधारण्याते.

दुपारी – विशेष करून उन्हाळ्यामध्ये शरीरात उर्जा प्रस्थापित होण्यासाठी दुपारी लिंबू पाणी प्या. यामुळे तहान भागेल आणि ताजेतवाने वाटेल.

० लक्षात ठेवा

लिंबाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेदेखील आहेत. अधिक प्रमाणात लिंबाचे सेवन केल्यास विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणवतात. त्यामुळे लिंबू खाण्याचे दुष्परिणाम जाणून त्याचे योग्य प्रमाण सुनिश्चित करुन सेवन केले पाहिजे. तसेच नियमितपणे लिंबाचे सेवन करत असाल तर आधी आपल्या शरीराचे पूर्ण चेकअप करून घेणे जरुरी आहे. 
Lemon Water Uses And Benefits
शिवाय नियमित किती प्रमाणात लिंबाचे सेवन करावे याबाबत डॉक्टर वा तज्ञांशी चर्चा करणे आवश्यक. इतकेच नव्हे तर आपल्याला कोणत्याही आजारचे निदान करण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर लिंबू पाण्याचे सेवन करा.