Let's know the right times to drink coconut water ......

नारळ पाणी पिण्याच्या योग्य वेळा जाणून घेऊया ……

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात नारळ पाणी हे असलेच पाहिजे कारण नारळ पाणी घेतल्याने आपल्या आरोग्याच्या समस्या या काही प्रमाणात कमी होतात. आपल्याकडे आजारी माणसाला नारळ पाणी हे दिले जाते. नारळ पाणी म्हणजे एक सलाइनची बाटली असे म्हंटले जाते. त्यामुळे आपल्या शरीरासाठी नारळ पाणी हे कधी तरी घेतले गेले पाहिजे. ते आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे.

भारतीय उपखंडाला जवळपास ७२०० किमी चा किनार पट्टा लाभला आहे. त्या किनार पट्टीवर सर्वत्र नारळाची रोपेच आपल्याला पाह्यला मिळतात. अश्या वेळी आपल्याकडे ओल्या नारळाची आणि शहाळ्याची अजिबात कमतरता नाही. त्यामुळे आहारात त्याचा थोडा का होईना वापर करणे आवश्यक आहे. नारळाचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत, नारळामध्ये जास्त प्रमाणात थंडावा असतो. तसेच तहान भागवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर हा केला जातो. अलाहादायक थंड पाण्याने आपल्या शरीराची पाण्याची गरज भागवणे याचे काम नारळाचे पाणी करते. तसेच त्याच्यामध्ये काही प्रमाणात मलाई असते . पांढरी मलाई सुद्धा लाभकारक आहे. नारळाचे पाणी जंतुसंसर्गीय नसते. ओल्या नारळामधले पाणी हे गोड तसेच काही प्रमाणात आंबट पण असते.

औषधी उपयोग —

नारळाचे पाणी हे कॉलरा या आजारामध्ये जास्त लाभकारक आहे. कारण त्या काळात जुलाब आणि उलट्या होऊन शरीरातील पाण्याची क्षमता हि पूर्ण कमी झालेली असते. त्यावेळी शरीरात कमी प्रमाणात क्षार उरतात. कमी प्रमाणात निर्माण झालेल्या क्षार मुळे शरीरामध्ये थकवा हा जास्त प्रमाणात जाणवतो. त्या वेळी नारळाचे पाणी पिल्याने शरीरात जे कॉलरा चे जंतू असतात ते सुद्धा नष्ट होण्यास मदत होते. कारण नारळाच्या पाण्यात कोणताच जंतू संसर्ग हा नसतो.

नारळाच्या पाण्यात जर तुम्ही लिंबू मिसळले तर त्यावेळी त्याच्यामध्ये असलेले ‘सी’ जीवन सत्वाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. नारळाचे पाणी हि मूत्र साफ करण्यास सुद्धा मदत करते. मूत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात युरीन असते. अश्या वेळी ते शरीरातून बाहेर फेकण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर हा करावा . सर्वात महत्वाचे म्हणजे कोवळ्या नारळाच्या पाण्याचा वापर हा आहारात केला जावा.