Lipstick
| | |

ओठांना सुंदर बनविणारी लिपस्टिक आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मेकअप हा विषय स्त्रियांचा अगदीच वीक पॉईंट आहे. कारण असा सार्वजनिक समज आहे कि, मेकअप केल्याने आपण सुंदर दिसतो. यात काही अंशी तथ्य असले तरी मनाच्या सौंदर्यासमोर चेहऱ्याचे सौंदर्य काहीही कामाचे नाही. तरीही स्त्रियांमध्ये विशेष करून लिपस्टिक हा अगदी आवडीचा विषय मानला जातो. कितीतरी स्त्रियांकडे मेकअप पाऊचमध्ये विविध लिपस्टिक शेड असतात. लीपस्टिकमुळे ओठांची आकर्षकता वाढत असली तरीही वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे कि लीपस्टिक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

लिपस्टिकमध्ये पिग्मेंट, तेल, वॅक्स, इमोलिएंटस, लिप बाम, लीड असते. यामधील काही घटक एकमेकांना पोषक समाविष्ट असतात. मात्र यांचे प्रमाण प्रत्येक लिपस्टिकमध्ये कमी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे कोणत्याही चांगल्या ब्रँडची लिपस्टिक असली तरीही त्यामध्ये या गोष्टींचे प्रमाण वेगवेगळे असते. म्हणून लिपस्टिकच्या सतत वापरामुळे आरोग्यविषयक त्रास संभवतात. चला तर जाणून घेऊया लीपस्टिकचे दुष्परिणाम :-

० लिपस्टिक लावण्याचे दुष्परिणाम

१) शरीरात विषारी घटकांचा समावेश

लिपस्टिकमधील केमिकल्स हे विषारी असतात. यातील लिपस्टिकमध्ये आढळणारे लीड, बिस्मथ ऑक्सीक्लोराईड हे घटक अधिक विषारी आणि घातक असतात. शिवाय यातील केमिकल्स थेट शरीरात प्रवेश करू शकतात. कारण लिपस्टिक लावली असता पाणी पिताना वा पदार्थ खाताना शरीरात लिपस्टिक जात राहते आणि ती कालांतराने शरीरावर परिणाम केल्याचे दिसून येते.

२) पोटाचा ट्युमर होण्याची शक्यता

Stomach Pain

लिपस्टिकमधील हानिकारक घटक पोटावर गंभीर परिणाम करत असतात. यातील लीड पोटात गेले तर पोटामध्ये ट्युमर होऊ शकतो. कारण लीडमध्ये न्युरोटॉक्झिन नावाचा हानिकारक घटक असतो. जो शरीरात गेल्याने मज्जासंस्थेवर परिणाम करतो.

३) कॅन्सरची शक्यता

लिपस्टिकमध्ये असणारे प्रिझरव्हेटिव्ह म्हणजे पॅराबिन आणि फॉर्मल्डिहाईड हे घटक त्वचेच्या पोअर्समध्ये जातात. यामुळे विविध आजार होण्याची शक्यता बळावते. त्यामध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची शक्यता आहे. लिपस्टिकच्या एका वापरानंतर लगेच हा त्रास जाणवत नाही. पण अनेक रिसर्चनुसार, लिपस्टिकमधील केमिकल्स शरीरावर असा गंभीर परिणाम करतात की कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

४) ह्रदय आणि मेंदूच्या कार्यात अडथळा

लीपस्टिकमुळे शरीरात लीड गेल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीरातील कार्य क्षमता नमते. लीपस्टिकमुळे रक्ताला अडथळा आल्यामूळे ह्रदय आणि मेंदूपर्यंत ते थेट आणि सुरळीत पोहचत नाही. परिणामी हृदय आणि मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.

५) ब्रेस्ट कॅन्सर

Breast Cancer

लिपस्टिक मधील हानिकारक घटक कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतात. यात महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आणि भीती जास्त असते. लिपस्टिकमध्ये असणारे प्रीझरव्हेटिव्ह शरीरात जास्त गेल्याने ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता अधिक बळावते.

६) मूत्रपिंड निकामी होण्याची भीती

Kidney Stone

लिपस्टिकमध्ये असणारे कॅडिअम, मॅग्नेशीअम आणि क्रोमिअम हे घटक शरीरासाठी हानिकारक असतात. जे एखादा अवयव निकामी करु शकतात. त्यामुळे जर लिपस्टिकमध्ये या घटकांचे प्रमाण जास्त असेल तर मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय पोटाचा ट्युमर वा पोटाचे त्रासदेखील होऊ शकतात.