| | | |

लिक्विड डाएट ठरतंय अकाली म्हातारपणाचे कारण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। त्वचेच्या आरोग्यासाठी हायड्रेशन महत्वाचे असते. आपल्या त्वचेतील ओलावाच त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवते. यासाठी अनेकजण त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी लिक्वीड डाएट घेण्याचा सल्ला देताना दिसतात. कारण त्वचा हायड्रेट करण्यासाठी भरपूर पाणी पिण्यापेक्षा लिक्वीड डाएटचा फायदा होतो. मात्र, यामुळेच त्वचा खराब होऊन वेळेआधीच त्यावर सुरकुत्या येतात आणि अकाली म्हातारपण येते.

कारण लिक्वीड डाएटमुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरामधून पाणी बाहेर पडते. घाम किंवा युरीनच्या रूपांमध्ये हे पाणी बाहेर पडून या रासायनिक प्रक्रियेदरम्यान शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचेच्या आतील आणि बाहेरील सेल्स डेड होतात. त्यामुळे चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक व अल्कोहोल हे चार पदार्थ लिक्विड डाएट म्हणून घेण्याचा सल्ला कुणी दिला तर, तो मुळीच वापरू नका. कारण, चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते आणि सॉफ्ट ड्रिंकमध्ये वापरण्यात येणारे प्रिझर्वेटिव्ह त्वचेला हानी पोहोचवतात.

  • लिक्वीड डाएटचे शरीरावर होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे:-

बॅड कपिलरीज – आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त, ऑक्सिजन आणि पाणी पोहोचवण्याचे काम कॅपिलरीज करतात. त्यामुळे चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक आणि अल्कोहोल या चारही ड्रिंकच्या सेवनामुळे आपल्या शरीरात बॅड कॅपिलरीज वेगाने वाढायला लागतात. ज्यामुळे आपोआपच त्वचा रुक्ष आणि निस्तेज होऊ लागते.

आर्टरीजच्या आकारात फरक – शरीरातील आर्टरीज आणि त्वचा यांच्यामध्ये कॅपिलरीज काम करत असता. त्यामुळे त्वचा हायड्रेट होते. मात्र चहा, कॉफी, कोल्ड्रिंग किंवा मद्य हे पदार्थ आपल्या शरीरामध्ये पोहोचल्यानंतर आर्टरीजपर्यंत पोहोचतात आणि याचा परिणाम स्वरूप त्यांचा आकार कमी होतो.

रक्तपेशींमध्ये पोषक घटकांच्या मात्रेत घट – चहा, कॉफी, कोल्ड्रिंक किंवा मद्य उन्मुळे आपल्या शरीरातील रक्त पेशींमध्ये ऑक्सिजन पोषकतत्व आणि पाणी यांचा पुरवठा अतिशय कमी होत जातो आणि परिणामी पोषक तत्त्वांची मात्रा घटते. ज्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते.

  • योग्य लिक्विड डाएट कोणते?
    – लिक्विड डाएट म्हणून चहा, कॉफी, सोडा यांसारखे पदार्थ घेतल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतो. मात्र, याऐवजी लिक्विड डाएट म्हणून ग्रीन टी, गोल्डन मिल्क, फळांचा रस घेतला असता शरीराचे आणि त्वचेचे आरोग्य जपण्यास फायदा मिळेल. शिवाय आठवड्यातले फक्त २ दिवस गोल्डन दूध, फळांचा रस आणि ग्रीन टी प्यायल्याने आपल्या त्वचेवर याचा लगेच परिणाम दिसायला लागतो. आपली त्वचा हायड्रेट होते आणि सीबम कमी होतात. ज्यामुळे त्वचा तेलकट होत नाही. स्क्रीनचा पीएच संतुलित होतो. परिणामी त्वचेचा रुक्षपणा कमी होतो.