Happy Face
| |

आयुष्य असं जगा कि मरणाची भीती वाटणार नाही; तज्ञांनी सांगितले निरोगी जीवनाचे रहस्य

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जिवंत आहोत तोपर्यंत जगत राहूया.. उद्या कधीतरी मरणाला मिठी मारायचीच आहे. असा कितीतरी लोक विचार करत असतील. पण कुणी असा विचार का करत नाही.. कि आहे ते जीवन नुसतं जगायला नको तर भरभरून जगूया म्हणजे मरताना काहीतरी राहील असं वाटणार नाही. आजकालची जीवनशैली, धावपळीचं आयुष्य माणसाच्या आरोग्यावर इतका प्रभाव करत आहे कि माणूस जगायला विसरला आहे. परिणामी माणसाची जगण्याची वयोवर्षे घटत चालली आहेत. आपली जीवनरेषा सुरळीत आणि दीर्घ असावी असे प्रत्येकाला वाटत असले तरीही मरण कधी कुठे कसे येईल याची शाश्वती कुणाकडेच नाही. त्यामुळे तज्ञांनी काही खास मुद्दे सांगितले आहेत. जे निरोगी आणि निर्धास्त जगायला मदत करतात.

साधारणपणे आपल्याला निरोगी राहण्यासाठी काय गरजेचे आहे..? चांगली झोप, चांगला आहार आणि नियमित व्यायाम. बरोबर..? पण याशिवाय अजून काही गोष्टी अश्या आहेत ज्यामुळे आपण मस्त आणि स्वस्थ जगू शकतो. एकमेकांप्रति व्यक्तीचा चांगला व्यवहार हि बाब आपले आयुष्य वाढवू शकते. होय. कोलंबिया यूनिव्हर्सिटीमधील सर्टिफाइड मनोचिकित्सक डॉ. कॅली हार्डिंग यांनी एका संशोधनात हि बाब सिद्ध केली आहे. त्यांच्या संशोधनानुसार, चांगलं व्यक्तीत्व आणि दुसऱ्यांप्रति दयाळू राहिल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स प्रभावित होतात. ज्यामुळे माणसाचे आयुष्य ७ वर्षाने अधिक वाढू शकते. माणसाचा दयाळू स्वभाव त्याच्या इम्यूनिटी आणि ब्लड प्रेशरवर चांगला प्रभाव पाडतो. ज्यामुळे ब्लड प्रेशर आणि स्ट्रेस लेव्हल घटतं आणि वय वाढतं.

निरोगी आयुष्यसाठी सोप्या टिप्स

१. चांगले मित्र बनवा –
आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतील जातील. पण मित्र ते येतात आणि आयुष्याचा अविभाज्य घटक होऊन जातात. त्यामुळे चांगले मित्र बनवा. कारण चांगले मित्र आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. रिसर्चनुसार, मजबूत नाती आणि सामाजिक आधार एखाद्या व्यक्तीची जिवंत राहण्याची शक्यता कमी नातेसंबंध असलेल्या लोकांच्या तुलनेत २२% जास्त असते. मित्र केवळ आनंदातच नव्हे तर वाईट काळातही सोबत असतात. त्यामुळे गंभीर त्रासात मित्र ताणतणावापासून रक्षण करतात.

२. प्रामाणिक आणि चांगला व्यवहार – 
संशोधनानुसार, दुसऱ्यांची मदत करणे, दुसऱ्याप्रति प्रेम-आदर-काळजी व्यक्त करणे आणि मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला वेळ देणे पाऊले आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. कारण असे केल्यामुळे कुणासाठीही आपल्या मनात भेद भाव, कुत्सित विचार, द्वेष, राग, मत्सर, लोभ, हाव अशा भावना उत्पन्न होत नाहीत. परिणामी मन आणि मेंदू दोन्हीही तणावमुक्त राहतात.

३. खूप आणि मनसोक्त हसा – 
मनसोक्त हसल्याने आपला मेंदू बूस्ट होत राहतो. कारण हसल्याने कोर्टिसोल आणि एंड्रोफिन्ससारखे हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे इम्यूनिटी आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. संशोधनानुसार, भरपूर हसणारे लोक सरासरी ७९.९ वर्ष जगतात. तर त्यांच्यापेक्षा थोडं कमी हसणारे लोक सरासरी ७५ वर्षे जगतात. तर अजिबात न हसणारे लोक सर्वात कमी ७२.९ वर्ष जगतात.

४. काही सवयी – 
मित्रांनो काहीही असो पण नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे रहा. चांगलं बोला आणि चांगलं ऐका. चांगलं वागा आणि प्रत्येकाला चांगली वागणूक द्या. कारण यामुळे मनुष्याच्या वयावर आणि आरोग्यावर प्रभाव पडतो. संशोधनानुसार, एक पॉझिटिव्ह मेंटल अॅटिट्यूड आपलं जीवन ११ ते १५% वाढवू शकतो. त्यामुळे नेहमी हेल्दी कॉम्पिटिशनचा विचार करा.