Big Nails
| | |

लांब नखे दिसायला आकर्षक पण आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालच्या स्त्रियांना वाढलेली लांब नखे फारच आवडतात. याचे कारण म्हणजे वाढलेली नखे अत्यंत आकर्षक दिसतात. त्यात जर नखांना सुंदर आकार दिला तर ती आणखीच लक्षवेधी ठरतात. यात काहीच वाद नाही की, सौंदर्यामध्ये त्वचा, केस आणि नखांचाही समावेश होतो. पण सौंदर्यासाठी नखांची वाढ प्रमाणापेक्षा जास्त असण्याची खरंच गरज आहे का? यावर एकदा नक्की विचार करा. कारण वाढलेली नखे आरोग्याचे नुकसान करू शकतात.

आजकाल नेल आर्ट्सची अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध असल्यामुळे महिलांमध्ये याचे विशेष आकर्षण दिसून येत आहे. मात्र जे आकर्षण आपल्या आरोग्याचे नुकसान करू शकते त्याच्यापासून दूर राहणे कधीही चांगलेच नाही का..? जर तुम्हालाही वाढलेल्या नखांची आवड असेल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. जाणून घ्या नखांमुळे काय नुकसान होते ते खालीलप्रमाणे:-

> नखं वाढली कि त्यात घाण साचते. या घाणीत बॅक्टेरिया वाढत जातो. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.

> नखांमध्ये साचलेली घाण जेवताना पोटात जाऊ शकते. यामुळे पोटदुखी आणि उलट्या होण्याची तक्रार वाढते.

> नखांमधील घाण पोटात गेल्यास जुलाबसारखी समस्या होऊ शकते.

> मोठ्या नखांमुळे कित्येकदा स्वतःला किंवा इतरांना इजा होण्याची शक्यता असते.

> नखांनी ओरबाडल्यास त्वचेचे नुकसान होते आणि झालेल्या जखमेचे व्रण राहतात.

> नखे ​​मोठी असल्यास स्वयंपाक करतेवेळी अन्न दूषित होऊ शकते.

> नखांमध्ये साठलेली घाण वेगाने बॅक्टरीया वाढवते. यामुळे इन्फ्लूएंझा सारख्या सहजपणे प्रसारित होणाऱ्या रोगाची लागण होऊ शकते.

> अनेकांना नखं वाढल्यावर चावायची सवय असते. यामुळे बोटांना वा ओठांना दुखापत होऊ शकते. त्यात नखं वाढली कि साहजिकच असे लोक नखं चावतात. परिणामी इजा होते.

० महत्वाचे – वरीलपैकी कोणतीही जोखीम टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे नखांची काळजी घेणे. यामध्ये नखे ट्रिम करणे अत्यंत गरजेचे आहे. जर नखे लांब होत असतील तर वेळीच ट्रिम करा. याशिवाय वारंवार हात स्वच्छ करा. यामुळे नखेही आपोआपच स्वच्छ राहतील.