| |

नाशपतीसारखे दिसणे लाजिरवाणे नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगण्यासाठी आपण किती आणि काय काय करत असतो. भलं मोठं डाएट चार्ट फॉलो करूनसुद्धा जेव्हा फरक पडत नाही तेव्हा एका मर्यादेनंतर आपण सगळेच प्रयत्न सोडून देतो. अनेकदा जाड असणे, प्रामुख्याने एखाद्या फळासारखे वगैरे आपल्याला संबोधले गेले असता एक न्यूनगंड निर्माण होतो. काही लोकांच्या शरीराचा आकार हा बेढब असतो. याचे कारण त्यांच्या शरीरावर जमा झालेली अनावश्यक चरबी. याला जाडपण म्हणता येईल. पण काही लोकांचा आकार नाशपती फळासारखा असतो. या लोकांना जाड कसे काय म्हणायचे?

मनुष्याच्या दिर्घायुष्याच्या पाठीमागे त्याच्या शरीराच्या आकाराचीसुद्धा एक महत्वाची भूमिका असते, असे तज्ञ सांगतात. यात मुख्य म्हणजे ज्या लोकांच्या शरीराचा आकार नाशपती सारखा असतो ते लाजिरवाणे असू शकत नाही. तर आरोग्याच्या दृष्टीने शरीराचा हा आकार अतिशय लाभदायक आहे. याबाबत तज्ञ प्रामुख्याने सांगतात कि, जाड मांड्या आणि गोलाकार नितंब मनुष्याचे आयुष्य वाढवण्यात उपयोगी ठरतात.

० नाशपती आकाराचे शरीर म्हणजे काय?
– एखाद्या व्यक्ती शरीर यष्ठी एका विशिष्ट आकारासारखी अर्थात नाशपती(पेर, PEAR) फळासारखी असणे. नाशपती आकाराच्या लोकांच्या शरीराच्या वरील भागाच्या तुलनेत खालील भाग जास्त रूंद असतो. डॉक्टरांनी मिडल बॉडीसाठी Pear म्हणजे नाशपतीसारखा आकार चांगला असल्याचे म्हटले आहे. जाणून घेऊयात फायदे खालीलप्रमाणे:-

१) ब्रिटनच्या NHSचे डॉक्टर करण राजन सांगतात कि, पोट वा आतड्यांऐवजी ग्लुटोफेमोरल एरियात फॅट जमा झाल्याने कार्डियोव्हस्क्यूलर डिसीज म्हणजे हृदयाचे आजार आणि मेटाबॉलिक आजारांचा धोका कमी होतो.

२) तज्ञ सांगतात कि, आतड्यांमध्ये जमा फॅट अवयवांना चारही बाजूंनी गुंडाळते आणि सायटोकिन्स-फॅटी अ‍ॅसिड रिलीज करते. हि स्थिती इन्फ्लेमेशनचे कारण होते आणि यामुळे शरीरात हृदयासह अनेक प्रमुख अवयव डॅमेज होतात. तर ग्लुटोफेमोरल फॅट सामान्यपणे त्वचेच्या आत पसरते. अशावेळी नाशपती आकाराच्या व्यक्तींच्या शरीरात आतड्यांमध्ये फॅट जमा होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे फायदा होतो.

३) नाशपती आकाराच्या शरीरात मांड्यांमध्ये फॅट एक स्पंजप्रमाणे काम करते. ते फॅटी अ‍ॅसिड स्टोअर करते आणि शरीराच्या आतील भागात त्यास पसरण्यापासून रोखू शकते. यासाठी मोठ्या मांड्या मनुष्याचे आयुष्य वाढवण्यात लाभदायक ठरतात.

४) ग्लुटोफेमोरल एरियामध्ये जमा फॅट एक सबअ‍ॅटोमिक पार्टिकल लेप्टन रिलिज करते. भूक आणि वजन दोन्ही रेग्युलेट करते. यामुळे नाशपती आकाराचे शरीर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

० संशोधनाचा रिपोर्ट सांगतो कि,
– मोठ्या मांड्या असलेल्या लोकांमध्ये हृदयाशी संबंधीत आजारांचा धोका कमी असतो.
– कमजोर मांड्या असलेल्यांच्या तुलनेत मोठ्या मांड्या असेल्यांमध्ये ब्लड प्रेशरसंबंधी समस्यासुद्धा कमी दिसल्या.
– यामध्ये संशोधकांना आढळले की, जास्त वजन असलेले पुरुष आणि महिलांच्या मांड्या अनुक्रम ५५ सेमी आणि ५४ सेमीपेक्षा जास्त होत्या, त्यांची प्रेशर लेव्हल लो होती. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसिज, स्ट्रोक, किडनी डिसिज आणि हार्ट फेलियरची शक्यता कमी आढळली.
– शिवाय पोटाच्या चरबीच्या उलट मांड्यांमध्ये जमा फॅट मेटाबलिज्मसाठी लाभदायक असल्याचेही आढळले.