| |

काळ्याभोर घनदाट केसांसाठी घरच्याघरी बनवा हेअर मास्क; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर, काळेभोर, दाट आणि लांब सडक केस हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असत. इतकंच काय तर मुलांनाही आपले केस मऊ आणि मजबूत असावे असे वाटतेच. यामुळे केसांना सुंदर बनवण्यासाठी न जाणे कित्येक उपाय करण्यात आपण आपला वेळ घालवत असतो. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे केस पातळ होणे असेल किंवा केसांमध्ये कोंडा होणे, अकाली केस पिकणे, केसांना फाटे फुटणे अश्या अनेक समस्या जाणवतात. यामुळे आपल्या केसांना पुन्हा एकदा घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी आपण अनेक महागडी सौंदर्य उत्पादने, शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क इत्यादी गोष्टींचा सर्रास वापर करतो. परंतु, हे सर्व उपाय करूनही आपले केस काही घनदाट होत नाही.

विशेषत: पावसाळ्यात आणि हिवाळ्यात केसांच्या समस्या अधिक होतात. पावसाळ्यात सतत भिजण्यामुळे केस पातळ होण्याचा त्रास खूप होतो. तर हिवाळ्यात थंडीमुळे टाळूची त्वचा कोरडी झाल्याने कोंड्याचा त्रास होतो. अशा सर्व समस्यांवर घरगुती उपाय म्हणून काय करता येईल? तर याचे उत्तर आहे हेअर मास्क बनवता येईल. होय. आता केसांना घरच्याघरी बनवलेल्या हेअर मास्कचा वापर करून दाट, लांब आणि मऊ बनवता येते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

  • हेअर मास्क १

सामग्री – १ अ‍ॅव्होकाडो, १ अंड, २ चमचे मध, २ चमचे ऑलिव्ह ऑइल
वरील सर्व सामग्री एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. यासाठी मिक्सरचा वापर करता येईल. हि पेस्ट तयार झाल्यानंतर केसांना लावा. साधारण अर्धा तास वा सोयीनुसार रात्रभर देखील हा मास्क लावून ठेवू शकता. यासाठी शॉवर कॅपचा वापर करा. यानंतर शॅम्पू आणि थंड पाण्यानं केस धुवा.
यामुळे केस लांब आणि दाट होतील. शिवाय केसांना नैसर्गिक चमक येईल.

  • हेअर मास्क २

सामग्री – १ वाटी कोरफडीचा गर, ४ ते ५ चमचे नारळाचे दूध
कोरफडीच्या गरामध्ये नारळाचे दूध मिसळा. ते चांगले फेटून घ्या आणि हे मिश्रण केसांच्या मुळांपासून लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. अर्ध्या तासानंतर सौम्य शाम्पूने धुवून टाका. साधारण ३ आठवडे हे केल्यास केसांमध्ये फरक दिसून येईल. यामुळे केस दाट, मऊ आणि लांब सडक होतात.

  • हेअर मास्क ३

सामग्री – १ केळे, १ एवोकॅडो, १ चमचा ऑलिव्ह ऑइल
केळ आणि एवोकॅडो एकत्र स्मॅश करून यात ऑलिव्ह ऑईल मिळून एक पेस्ट तयार करा. हि पेस्ट टाळूवर मसाज करा. यानंतर ४५ मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस साध्या पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने धुवा. अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी हे १ महिन्यासाठी आठवड्यातून दोनदा करा.

  • हेअर मास्क ४

सामग्री – २ कप गरम पाणी, २ चमचा आवळा पावडर
गरम पाण्यात आवळा पावडर मिसळा आणि अर्धा तास असेच ठेवा. यानंतर हे मिश्रण बोटांच्या मदतीने डोक्यावर लावा आणि केसांमध्ये १ तास राहू द्या. यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून २ वेळा असे केल्यास १ महिन्यात केस घनदाट होतील. हा फरक तुम्ही स्वतः अनुभवालं.