| | |

केसगळती आणि नखांच्या कमकुवतपणावर मात करण्यासाठी आहारात करा बदल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा ऋतू कोणताही असो केसगळती आणि नखे तुटणे हि सर्वसामान्य बाब झाली आहे. त्यात दिवसभराच्या कामाच्या दगदगीमुळे या समस्यांवर उपाय करण्यासाठी पार्लर वा सलॉनमध्ये वारंवार जाणे शक्य होत नाही. त्यामुळे केस आणि नखे अधिकच निस्तेज दिसू लागतात. यासाठी नियमित हेअर स्पा आणि मॅनिक्युअर, पेडिक्युअर करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु मित्रांनो आणि मैत्रिणींनो, घरच्या घरी आहारात अगदी थोडासा बदल करूनही केस आणि नख मजबूत करता येतात. विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला काही अश्या पदार्थांविषयी सांगणार आहोत. जे तुमच्या ओळखीतही आहेत आणि यातील काही तर दररोजच्या वापरातही आहेत. यासाठी जाणून घ्या केसांच्या आणि नखांच्या आरोग्यासाठी आहारात कोणते खाद्यपदार्थ समाविष्ट कराल ते खालिलप्रमाणे:-

१) टोमॅटो – आपल्याकडे अनेको अन्न पदार्थांमध्ये हमखास टोमॅटोचा वापर केला जातो. कारण टोमॅटो व्हिटॅमिनचा पूरवठा करणारा एक प्रमुख खाद्यपदार्थ मानला जातो. त्याचप्रमाणे टोमॅटोमुळे ‘केरोटोनॉईड’, ‘बीटा केरोटीन’ आणि ‘ल्युटेन’देखील मिळते. परीणामी आपल्या त्वचेचं सुर्यप्रकाशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण होते. याशिवाय टोमॅटोमुळे हेअर फॉलिकल्स मजबूत होतात आणि केसगळती थांबते.

२) पालक – पालक खाण्यामुळे शरीराला ‘व्हिटॅमिन ए’ आणि ‘व्हिटॅमिन सी’ भरपूर मिळते. यातील व्हिटॅमिन ए’मुळे हेअर स्कॅल्पचे आरोग्य राखता येते. केसांची मुळे मजबूत झाल्याने केस कमी तुटतात. शिवाय यामध्ये असणारे लोह केसांना नैसर्गिक चमक देते. तसेच शरीराला पुरेश्या प्रमाणात पोषण मिळाल्याने केसांचे आणि नखांचे सक्षमीकरण होते.

३) डाळी आणि कडधान्ये – डाळी आणि कडधान्यांमध्ये ‘प्रोटिन’, ‘झिंक’ आणि ‘बायोटिन’ असते. जे केस आणि नखांना मजबूत करण्यासाठी मदत करतात. या पोषकतत्वांच्या अभावामुळे केस आणि नखे कमजोर होतात व तुटू लागतात.

४) अंडी – अंड्यामुळे शरीराला ‘प्रोटिन’ आणि ‘बायोटिन’ मिळते. यामुळे केस व नख मजबूत होतात. शिवाय हेअर फॉलिकल्स तयार होण्यासाठी प्रोटिन्सची गरज असते. त्यामुळे आहारात प्रोटिन कमी झाले तर केस गळू लागतात. तसेच शरीराला केसांसाठी उपयुक्त ‘केराटिन’ प्रोटिन तयार करण्यासाठी बायोटिनची गरज असते. या दोन मुख्य घटकांसोबतच अंड्यामध्ये झिंक, सेलेनिअम असे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे केस व नखे मजबूत होण्यास मदत होते.

५) सुकामेवा – सुकामेव्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड आणि शेंगदाण्यांचा समावेश करून खा. कारण यांमध्ये ‘ओमेगा फॅटी अॅसिड’ ‘व्हिटॅमिन्स’ ‘अॅंटिऑक्सिडंट’ आणि ‘मिनरल्स’ भरपूर असतात. त्यामुळे जेव्हा आपण सुकामेवा खातो, तेव्हा हे सर्व घटक शरीराला मिळतात. हे सर्व घटक केस आणि नखं मजबूत करण्यासाठी लाभदायक असतात.

६) ओटमील – एक वाटी ओटमील दररोज सकाळी खाल्ले असता फक्त पोटच भरत नाही तर दिवसभर उत्साही वाटते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात ‘तांबे’ ‘झिंक’ आणि ‘व्हिटॅमिन बी’ असते. यामुळे केस आणि नखे मजबूत होतात.