| |

लहान बाळांच्या नाजूक डोळ्यांसाठी घरच्याघरी बनवा काजळ; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन| आपल बाळ हे जगातल्या इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा आईला नेहमीच अधिक प्रिय असत. आपल्या पोटचा गोळा नेहमी सुरक्षित असावा असे प्रत्येक आईच्या मनाला वाटणे अगदीच साहजिक आहे. त्यामुळे बाळ झाल्यानंतर त्या बाळाची आई प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष देत असते. जसे की, बाळाची मालिश, अंघोळीचा साबण, केस धुण्याचा शाम्पू आणि अगदी डोळ्याची काळजी घेणारं काजळ. आपण सारेच जाणतो की, बाळाच्या डोळ्यांसाठी काजळ खूपच फायदेशीर असत. यामुळे बाळाचे डोळे सुरेख आणि रेखीव दिसतात. पण आजकाल बाजारात मिळणाऱ्या कित्येक गोष्टींमध्ये भेसळ असल्यामुळे काजळ विना भेसळ असण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून आपल्या बाळाच्या निरोगी डोळ्यांसाठी घरच्या घरी घरगुती काजळ बनवा. कसे? चला जाणून घेऊयात:- _

 

घरी काजळ बनवण्यासाठी लागणारी साहित्य

१) एकाच आकाराच्या दोन वाट्या आणि एक प्लेट

(या तिन्ही वस्तू वापरापूर्वी स्वच्छ धुवून घ्या)

२) शुद्ध देसी तूपाचे काही थेंब

३) माचिस

४) दिवा आणि वाती

५) एरंडेल तेल

६) चाकू आणि काजळ ठेवण्यासाठी गोल आकाराची छोटीशी डब्बी

 

० घरगुती काजळ बनवण्याची कृती – सगळ्यात आधी दगडाची चुल बनवा. आता दोन्ही वाट्या चुलीच्या दोन बाजूला दगडात लावा आणि जमिनीवर प्लेट ठेवा. दोन्ही वाट्यांमध्ये अंतर राहिलं याची काळजी घ्या. आता दिव्यात एरंडेल तेल घालून वाती लावा. हा जळता दिवा दोव्ही वाट्यांच्या मधोमध ठेवा. आता प्लेट दोन्ही वाट्यांच्या आधारे दिव्यावर उलटी करुन ठेवा. दिव्याची जळती वात प्लेटला लागली पाहिजे. साधारण २०-२५ मिनिटे थांबून प्लेट हलक्या हाताने उचला. आता प्लेटच्या पृष्ठभागावर लागलेला काळ्या रंगाचा थर तुम्ही पाहू शकता. तेच काजळ आहे. आता चाकूच्या मदतीने एका डब्बीत काजळ घ्या आणि त्यामध्ये काही थेंब शुद्ध साजूक तूपाचे थेंब टाका. या काजळाची डब्बी एखाद्या सुक्या आणि गरम जागी ठेवा आणि बाळासाठी वापरा.

 

बाळाला काजळ लावण्याचे फायदे:-

१) काजळ लावल्याने बाळाच्या डोळ्यांना आराम मिळतो.

 

२) काजळ लावल्याने बाळाला शांत आणि आरामदायी झोप लागते.

 

३) पूर्वीची लोकं असं मानायची की काजळ लावल्याने बाळाची रक्षा होते.

– याशिवाय बाळाला कोणत्याही वाईट गोष्टीची, व्यक्तीची नजर लागत नाही. अर्थात या गोष्टीमागे कोणतंही वैज्ञानिक कारण अजून तरी सापडलं नाहीये. पण मनाचं समाधान म्हणून आजही याचसाठी लोक बाळाला काजळ लावतात.

 

४) काजळ लावल्याने बाळ आकर्षक आणि गोड दिसते. यासाठी बाळाचे गाल, डोकं, पायाचे तळवे, हाताचे पंजे या भागांवरही छोटासा काजळ टिका लावू शकता.

 

५) काजळ लावल्याने बाळाचे डोळे तेजस्वी आणि मोठे दिसतात.