Kandepohe Tikki
| | |

उरलेले कांदेपोहे फेकू नका! बनवा चविष्ट आणि पौष्टिक टिक्की; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सकाळची न्याहारी वा नाश्ता किती महत्वाचं असतो हे आपण सारेच जाणतो. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अगदी चवीने आणि आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे कांदेपोहे. याच खरं कारण म्हणजे कांदेपोहे हा पदार्थ अगदी झटपट, कमी वेळात, कमी साहित्यात तयार होतो. शिवाय खायलाही अतिशय चविष्ट लागतो. त्यामूळे अनेकांचा आवडता नाश्ता म्हणून कांदेपोहे हा पदार्थ ओळखला जातो. यामुळे उशीर झाला असेल तर नाश्त्याला आणि ऐनवेळी कोणी पाहुणे घरी आले तर घराघरांत सर्रास गरमागरम कांदेपोहे बनतात.

अनेकदा असं होत कि, गडबडीत किंवा बोलण्याच्या नादात पोहे जरा जास्त झाले की ते फेकून द्यायची वेळ येते. कारण थंड झालेले पोहे एकतर कडक होतात. शिवाय त्यातून तेलही उतरते. त्यामुळे असे उरलेले पोहे पुन्हा खाणं आपल्या जीवावर येतं. कारण जरी हे पोहे गरम केले तरी त्याची चव बिघडते. अशावेळी पोहे टाकून देण्याऐवजी दुसरा पर्याय उरत नाही. असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साफ चुकीचे आहात. कारण आज आम्ही तुम्हाला असा एक पदार्थ सांगणार आहोत, ज्याच्या सहाय्याने उरलेले पोहे टाकून द्यावे लागणार नाहीत. शिवाय घरातली लहान मूलं आणि अगदी तुम्ही स्वतःदेखील हा पदार्थ मिचक्या मारत खाल. तर हा पदार्थ आहे उरलेल्या कांदेपोह्यांची खुसखुशीत, चविष्ट आणि तितकीच पौष्टिक टिक्की.

कांदेपोह्यांच्या टिक्कीसाठी लागणारे साहित्य – 

टिक्की बनविण्याची सोप्पी कृती –

सर्वात आधी उरलेल्या कांदेपोह्यामध्ये सगळ्या भाज्या बारीक चिरुन घाला. आता यात आलं, मिरची, लसूणची पेस्ट मिसळून घ्या. यानंतर आमचूर पावडर, कोथिंबीर, मीठ असे सर्व जिन्नस घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. यासाठी ब्रेडचे स्लाईस पाण्यात भिजवून मऊ करून घ्यावे. मऊ झालेले ब्रेड स्लाइस या मिश्रणात मिक्स करा. आता थोडे थोडे करीत तांदळाचे पीठ आणि दही घाला.

हे सर्व मिश्रण मिक्सरच्या सहाय्याने फिरवून एकत्र करून घ्या. यानंतर एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काशीहून हाताने एकजीव करा. (आवडीप्रमाणे उकडलेला बटाटा यात घातल्यास आणखी चविष्ट लागेल) या मिश्रणाच्या एकसारख्या टिक्की तयार करा. आता आवडीप्रमाणे तव्यातर तेल घालून शॅलो फ्राय करा किंवा तळून घ्या. मस्त तयार टिक्की सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

उरलेल्या कांदेपोह्यांच्या टिक्कीचे आरोग्यासाठी फायदे काय?

अधिक पोषणदायी पर्याय

सगळ्यात महत्वाच म्हणजे पोह्यांमध्ये भाज्यांचा समावेश केल्यास ते एक पूर्ण अन्न तयार होते. या टिक्कीत भाज्या असल्यामुळे पदार्थातील व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबरचे प्रमाण वाढते. तसेच आवडीनुसार यात मोड आलेली कडधान्य, सोयाबीन, शेंगदाणे किंवा उकडलेले अंड मिसळल्याने प्रोटीन्सची मात्रा वाढवता येते. एकंदरच उरलेल्या पोह्यांची टिक्की शरीराची पोषणता वाढण्यासाठी सहाय्यक आहे.

शारीरिक सुधारणा

पोह्यांमुळे शरीरात आयर्नची कमतरता किंवा अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता कमी होतो. कारण 100 ग्रॅम कच्च्या पोह्यातून शरीराला 20mg आयर्न मिळते. त्यामुळे पोहे खाणे असेही लहान मुले, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी हितकारी आहे. मात्र उरलेल्या पोह्यांची टिक्की बनवताना यात भाज्या आणि ऍन वाढीव जिन्नसांमुळे पोह्यांची गुणवत्ता वाढते. परिणामी यातील आयर्नची मात्राही वाढते. यातील आयर्नमुळे हिमोग्लोबिन सुधारते तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारल्याने रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते.

मधुमेहींसाठी फायदेशीर

मधुमेहींना आधीच काय खाऊ आणि काय नको असा प्रश्न पडलेला असतो. त्यात जर त्यांच्यासाठी पोह्यांसारखा पर्याय उत्तम आहे असे सांगितले तर याहून आनंद तो काय. हो कि नाही? मुळात मधुमेहींसाठी पोहे हा अत्यंत पोषक नाश्त्याचा पर्याय आहे. कारण पोह्यांचा आहारात समावेश केल्यामूळे रक्तातील साखर हळूहळू वाढते. तसेच पोटभर पोहे खाल्ल्याने बराच वेळ भूक नियंत्रणात राहते. शिवाय उरलेल्या पोह्यांमध्ये दह्याऐवजी लिंबाचा वापर केल्यास त्याची पोषकता अधिक वाढते. याचा मधुमेहींना लाभ होतो. शिवाय पोह्याच्या टिक्कीत सोयाचा वापर केल्यास याहून उत्तम नाश्ता मधुमेहींसाठी कोणताच नसेल.