| | |

पिरीएड्स मध्ये पिंपल्सपासून बचावासाठी आहारात करा ‘हे’ बदल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मासिकपाळी अर्थात पिरीएड्स हा काळ स्त्रियांसाठी अतिशय वेदनादायी आणि नकोनकोसा असतो. मासिकपाळीचे दिवस जवळ आले की अनेक स्त्रियांना ते नकोच असे वाटू लागते. कारण या दिवसांत असह्य वेदना आणि चिडचिड होते. याशिवाय चेहरा निस्तेज होतो आणि पिंपल्स? ते तर अधिकच बळावतात. साधारणपणे इतर दिवसांपेक्षा अधिक या दिवसात पिंपल्स येतात. हार्मोनल बदलांमुळे वाढणारे हे पिंपल्स अधिक त्रासदायक असतात. जे त्वचेचे अधिक नुकसान करतात. त्यामुळे अश्या दिवसात आपल्या त्वचेची काळजी घेणे अधिक महत्वाचे होते.

दरम्यान मासिक पाळीच्या स्थितीत चेहरा खराब होऊ नये म्हणून घरगुती उपायांपासून ते अगदी केमिकल पिल्स, बेंझॉल पेरॉक्साईड, सायक्लिक अ‍ॅसिड या सारख्या महागड्या व केमिकलयुक्त पर्यायांचा वापर केला जातो. मात्र तरीही पिंपल्सचा त्रास काही केल्या कमी होत नाही. अशावेळी अनेकदा आयुर्वेदीक उपचारांची मदत घेणे योग्य ठरते.

आयुर्वेदानुसार, आपला आहार आपले आरोग्य सुव्यस्थित ठेवण्यास सहाय्यक असतो. कारण प्रत्येक व्याधीचे मूळ पोटाशी निगडित असते. पिरिएड्सच्या दिवसात हॉर्मॉनल बदलांमुळे येणारे पिंपल्स आहारातील अयोग्य पदार्थांमुळे आणखी बळावतात. मैदा,कॉफी, चहा, तळलेले पदार्थ यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरात घातक आणि विषारी घटकांचे प्रमाण वाढते. तसेच मसालेदार, खारट, आंबट पदार्थदेखील शरीरात पित्तदोष व मेटॅबॉलिक रेटचे असंतुलन निर्माण करते. यामुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन वाढते. म्हणून डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये पाळावी. खालीलप्रमाणे:-

० हार्मोनल पिंपल्सचा त्रास रोखण्यासाठी आहारात खालील बदल करा.
– हार्मोन्सवर संतुलन राखायचे असेल तर यासाठी आपल्या आहारात फळं, सुकामेवा, भाज्या यांचा मुबलक समावेश असणं गरजेचं आहे. म्हणून,
१) फळं – सफरचंद, केळं, पेर आणि अंजीर.

२) भाज्या – कोबी, फ्लॉवर, हिरव्या पालेभाज्या, रताळं, भेंडी, हिरवे वाटाणे.

३) फॅट्स – खोबरेल तेल व तूप (यामध्ये lauric acid मुबलक असते. ज्यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघते तसेच हार्मोन्सच्या निर्मितीला चालना मिळते.)

४) मसाले – जिरं, लेमनग्रास, केशर, वेलची,बडीशेप आणि पुदीना.

५) पेय – बदामाचं दूध, नारळपाणी. या पदार्थांचा आहारजत समावेश असणे आवश्यक आहे.

० काय खाऊ नये?

१) फळं – द्राक्षं, चिंच, पिच, आंबट हिरवे सफरचंद.

२) फॅट्स – तिळाचं तेल, मक्याचं तेल.

३) भाज्या – चिली पेपर्स, वांग, ऑलिव्ह, कच्चा कांदा, मूळा, टोमॅटो, गाजर.

४) मसाले – मिरच्या, राई, सुंठ, लवंग, लसूण.

५) पेय – चहा, कॉफी, फिझी ड्रिंक्स, अल्कोहल.