Make use of these vegetables and fruits in summer days
|

उन्हाळ्याच्या दिवसांत या भाज्या आणि फळांचा करा वापर

हॅलो आरोग्य ऑनलाईन । भारतात प्रत्येक महिन्याला हवामानातील तापमान हे वेगवेगळे असते . प्रत्येक चार महिन्यानंतर वातावरणात ऋतू   बदल होत जातात . त्यानुसार खूप थंडी , खूप उष्णता असे थोडे वातावरण तयार होत असते . वातावरणानुसार आपल्या आहारात सुद्धा बदल करणे आवश्यक असते . कारण त्यानुसार तुमच्या प्रतिकार शक्तीत वाढ होण्यास मदत होते . अशा वेळी आपल्या आहारात योग्य भाज्या आणि फळांचा समावेश असणे गरजेचे आहे . उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र आपल्या आहारात थंड पदार्थच ठेवले पाहिजेत . त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होऊ शकते .

काकडी —

आपल्या आहारात काकडीचा समावेश केल्याने उष्णतेचा त्रास हा कमी होऊ शकतो.  शरीरात उष्णता वाढली तर मात्र उष्माघाताचे त्रास हे जाणवायला सुरुवात होते . काकडी हि उष्णता कमी करण्यास मदत करते . तसेच पोटाच्या समस्या या दूर होण्यासाठी काकडी हि आहारात असणे आवश्यक आहे .

दुधीभोपळा —

आहारात कोणत्याही ऋतूंमध्ये दुधीभोपळा याचा वापर केला जातो. ते पचायला सुद्धा हलके असते .

गवार —

गवार खाणे हे उन्हाळयाच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही . कारण त्याच्यामध्ये उष्णता हि जास्त असते.

बटाटा —

ज्या लोकांना वाताच्या समस्या आहेत त्या लोकांनी बटाटा खाणे टाळले पाहिजे . त्यामुळे उष्माघाताचा समस्या या निर्माण होणार नाहीत .

भेंडी —

जर तुम्हाला पोटाच्या समस्या या जाणवत असतीलकिंवा मुतखडा याचा त्रास हा जास्त असेल तर अश्या वेळी भेंडी हि आहारात ठेवू नये . कारण त्यामुळे मुतखडा याचा त्रास हा जास्त वाढू शकतो.

फळे —

आहारात फळे हे खात असाल तर ते आरोग्याला खूप फायदेशीर आहे . उन्हाळ्याच्या दिवसांत आपण जर फळे आहारात घेतले उष्णतेचा त्रास हा कमी कमी होऊ शकतो.