| | | |

झेंडूचं फुलं आरोग्यासाठी फायदेशीर; कसे? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्य, उत्सव वा समारंभ असल्यास झेंडूचे फुल असतेच असते. हे झेंडूचे फूल केवळ एवढ्यापुरताच कमी येते हा एक गोड गैरसमज आहे. कारण, झेंडूचे फुल हे एक औषधी गुणधर्मयुक्त असे फुल आहे. असे अनेक घटक झेंडूच्या फुलांमध्ये आढळतात जे आपल्या शरीरासाठी औषध म्हणून काम करतात. झेंडूच्या फुलाला हिंदीत ‘गेंदा’ आणि इंग्रजीत ‘मेरीगोल्ड’ म्हणतात. झेंडूमध्ये रेझिन, कॅरोटेनॉईडस्, फ्लेव्होनॉईडस्, स्टेरॉल, म्युसिलेज आणि सॅपोनीन हे घटक असतात. झेंडू बलवर्धक असतो. तो स्वेदल, कृमिनाशक आहे. झेंडूमुळे पित्त या पाचक रसाच्या निर्मीतीला चालना मिळते. आमांश दाह आणि अल्सर यावरसुद्धा झेंडू गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊयात झेंडूच्या फुलाचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) सर्दी आणि खोकला मिनिटांत बरा – कोणत्याही एलर्जीमध्ये झेंडू फायदेशीर आहे. खोकला बरा करण्यासाठी असो किंवा कितीही जुनाट सर्दी वा एलर्जी असो यासाठी झेंडूच्या पानांचा रस काढा आणि त्यात साखर मिसळून सेवन करा. या उपायाने लगेच आराम मिळेल.

२) कानदुखी दूर – कान दुखणे असो किंवा सूज यासाठी झेंडूचा रस काढा आणि कानात टाका. यामुळे कानदुखी बरी होते आणि सूजदेखील उतरते.

३) पोटाच्या आजारांवर गुणकारी – झेंडूची फुले पोटाचा कोणताही आजार बरे करण्यास सक्षम आहेत. शिवाय जर एखाद्यास बद्धकोष्ठता, गॅस वा पोटात पेटके येण्याची समस्या असेल तर झेंडूच्या फुलांचा रस प्यावा. अगदी काही दिवस हा प्रयोग रोज केल्यास आराम जाणवेल आणि पाचक प्रणाली देखील सुधारेल.

४) मुळव्याधीवर आराम – मूळव्याध बरा करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा रस अतिशय लाभदायक आहे. एखाद्याला मूळव्याध असेल तर त्यांनी झेंडूच्या फुलाच्या रसात काळी मिरी आणि मीठ घालून प्यावे. यामुळे मूळव्याधातील मस्सा आणि वेदना दूर होतील.

५) सुंदर त्वचा – आपल्या चेहर्‍यावर झेंडूच्या तेलाने मालिश केली तर सुरकुत्या आणि मुरुमांपासून मुक्तता मिळते. तसेच झेंडूच्या फुलापासून बनविलेले क्रिम आपल्या चेहर्‍यावरील डाग दूर करण्यास सहाय्यक असतात. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकते व चेहरा खुलून दिसतो.