| | |

इम्यूनोसप्रेसेन्ट औषधं घेणाऱ्या लोकांसाठी मास्क आवश्यक; का? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूमुळे लसीकरणाची मोहीम सुरु असल्याचे आपण सारेच जाणतो. पण खर्च केवळ लस घेतल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो का? तर याच उत्तर आहे नाही. कारण लस घेण्याबरोबर कोरोना नियमांचं पालन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तरच या वाढत्या संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. दरम्यान सरकारने कोरोना संबंधित अनेको नियम लावले आहेत. यात मास्क लावणे, अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर, तोंडाला सतत हात लावणे टाळणे अश्या नियमांची कडक अंबलबजावणी करण्यात आली. यासोबत संपूर्ण जगभरात लसीकरण सुरु झाले. यानंतर कुठेतरी कोरोनाचा वाढता कहर ओसरताना दिसतोय.

परंतु, कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही अनेक लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कात येत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे लसीकरण केवळ तीव्रतेचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे, असे स्पष्ट झाले आहे. शिवाय तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे, लसीकरण संसर्गापासून पूर्ण संरक्षण देत नाही आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं तसेच इतर सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) सूचनांनुसार, जे लोक ‘इम्यूनोसप्रेसेन्ट्स’ घेतात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणं अत्यावश्यक आहे.

० इम्यूनोसप्रेसेन्ट औषधं म्हणजे काय? आणि हि औषधं घेणाऱ्या लोकांसाठी मास्क आवश्यक का आहे?
– इम्युनोसप्रेसंट औषधं हा औषधांचा एक वेगळा वर्ग आहे. यकृत, हृदय किंवा किडनीसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणानंतर (Transplant) यापैकी काही औषधं रुग्णाला दिली जातात. जेणेकरून शरीराने प्रत्यारोपित केलेला अवयव नाकारण्याची शक्यता कमी होते. ल्यूपस, सोरायसिस आणि संधिवात अश्या विकारांवर उपचार करण्यासाठी इतर प्रकारची इम्यून संदर्भातील औषधं वापरली जातात. त्यामुळे या आजारांमूळे ग्रासलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडताना मास्क लावणे अतिशय गरजेचे आहे.

० का बाळगावी सावधानता?
– अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम अतिशय तिच्या वेगाने सुरू आहे. परंतु एक बाब लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे. हि बाब म्हणजे, कोणतीही लस कोरोनासारख्या विषाणूपासून पूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाला संसर्ग होण्याचा धोका असतो. परंतु नियमितपणे औषधाच्या सेवनाने किंवा एखाद्या व्यक्तीच्या आजारांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास अश्या संसर्गाचा धोका अधिक वाढतॊ.

० लसीकरण का गरजेचं आहे?
– लसीकरण आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्तीस चालना देतं. परंतु त्याची लक्षणं व्यक्तीच्या प्रकृतीनुसार बदलतात. त्यामुळे लसीकरण केवळ काही प्रमाणात व्हायरसपासून आपलं संरक्षण करण्यास सक्षम असते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *