read
|

मुलांना वाचनाची सवय लावायची असेल तर काय बरे करावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल   सारे  जग हे  मोबाइल आणि कॉम्पुटर वर  अवलंबून  आहे . त्यात लहान मुले सुद्धा सहभागी आहेत . अगदी लहान मुलांना काही खेळायचे असेल किंवा कोणत्याही प्रकारचा प्रश्न पडत असेल तेव्हा ते मोबाइलचाच वापर करतात. अनेक आई वडील सुद्धा मुलांना मोबाइल वापरण्याची  मुभा देतात. अश्या वेळी मुले सुद्धा मोबाइल चा वापर करतात. अगदी साधे साधे प्रश्न असतील तर सुद्धा मोबाईलचाच वापर हा केला जातो. कारण आई वडिलांना आपल्या मुलांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे आपोआप मुले हि मोबाइल कडे वळतात.

यावर्षी कोरोनामुळे सुद्धा मुलांचे  वर्ष वाया गेले आहे . सगळ्या मुलांचा अभ्यास हे ऑनलाईन होत आहेत . त्यामुळे मुलांचा जास्त वेळ हा मोबाइल वरच जातो. त्यामुळे मुलांना डोळ्याच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या आहेत . पण इतकी मोबाइल ची सवय झालेली मुलांना वाचनाची सवय लावणे जरा अवघडच आहे . नाही का ? आजकाल कोणत्याच मुलाच्या हातात पुस्तके हि दिसत नाहीत . पण मोबाइल मात्र दिसतो. सहज जरी मुलांना अभ्यासाचा प्रश्न केला तरी मुले मोबाइल मध्ये आहे . अशी उत्तरे देतात. त्यामुळे मुलांना गूगल मधील आयती उत्तरे मिळवून देण्यापेक्षा त्यांच्यात बदल करून मुलांना वाचनाची सवय लावा .

— वाचनाची सवय लावण्यासाठी मुलांना कधी तरी एखादे पुस्तक भेट म्हणून द्या . भेट दिलेल्या पुस्तकाचे वर्णन हे मुलांकडूनच ऐका .

— घरात मुलांसाटी आणि आपल्यासाठी एक छोटीशी लायब्ररी करा. म्हणजे मुलांना पुस्तके हाताळायची सवय हि लागू शकते.

— पुस्तके हाताळताना त्यांना त्यांच्या आवडीच्या पुस्तकांविषयी विचारा.

— वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांना तुम्ही वेगवेगळ्या चित्रांची पुस्तके हे आणून द्या.

— सगळ्यांसाठी एक ठराविक वेळ हा वाचनाचा ठेवा.

— मुलांना पुस्तके घेण्यास प्रोत्साहित करा.