| |

औषधी गुणधर्मयुक्त मुलेठी देते अनेको व्याधींपासून आराम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आयुर्वेदामध्ये अनेक अश्या वनस्पती आहेत ज्यांचा विविध व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जातो. त्यांपैकी एक म्हणजे मुलेठी. मुळात मुलेठी एक झुडूप वनस्पती आहे. सहसा या झाडाची सालं आणि मुळ्या सुकवून औषध म्हणून वापरले जाते. कारण त्याच्या मुलांमध्येच अनेक औषधी गुणधर्म आहेत. हे नावाला औषध असलं तरी इतरांसारख चवीला अजिबात कडू लागत नाही. उलट मुलेठी चवीने अतिशय गोड असते. तिचा उपयोग दात, हिरड्या आणि घश्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. या कारणास्तव, आजच्या काळात बर्‍याच टूथपेस्टमध्ये याचा वापर केला असल्याचे दिसून येते.

० मुलेठीचे फायदे

१) रोग प्रतिकारशक्तीत सुधार – मुलेठीच्या मुळांचा अर्क लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफेजच्या उत्पादनास उत्तेजित करतो. याचा फायदा संरक्षण तंत्रिका अर्थात रोग प्रतिकार करणाऱ्या पेशींमध्ये सुधार आणण्यासाठी होतो. यामुळे सूक्ष्मजंतूंचा हल्ला रोखता येतो. तसेच रोग प्रतिकारशक्तीची गुंतागुंत कमी करण्यासदेखील मदत होती आणि हि प्रक्रिया सुरळीत होते. परिणामी कोणताही संसर्ग आपल्याला सहज होत नाही.

२) पाचक प्रणालीत सुधार – ज्यांना पाचक समस्या आहेत किंवा पचन तंत्रासंबंधित कोणतीही अडचण आहे त्यांच्यासाठी मुलेठी फायदेशीर आहे. कारण मुलेठीमध्ये ग्लिसिरिझिन आणि त्याचे कंपाऊंड कार्बॉक्सिलॉन असते. जे पचनक्रियेमध्ये फायदेशीर असते.

३) हृदयाचे संरक्षण – आपले हृदय निरोगी ठेवायचे असेल तर मुलेठीच्या मुळांचा अर्क उपयोगी ठरतो. शिवाय मुलेठी कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास देखील मदत करते. यामुळे शरीरात पित्त साठत नाही.

४) घशाच्या आजारात फायदा – ज्या लोकांना खूप खोकला आहे, त्यांनी मुलेठीचा एक तुकडा तोंडात ठेवून शोषून घेतल्याने खूप फायदा होतो. यामुळे शरीराची श्लेष्मा बाहेर येण्यास मदत होते आणि खोकला थांबतो. शिवाय घशातील खवखव बरी होते.

५) शरीरातील अंतर्गत जखमांवर गुणकारी – मुलेठीमध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता आहे. यामुळे शरीराच्या अंतर्गत जखमांमध्ये देखील ते फायदेशीर आहे. म्हणून दररोज त्याचा अर्क प्यावा.

६) अल्सरपासून आराम – तोंडाच्या अल्सरमध्ये मधाबरोबर मुलेठी चघळणे खूप फायदेशीर आहे. हे पोट किंवा आतड्याचे अल्सर बरे करते. यामुळे संधिरोगाच्या समस्येवरदेखील उपचार करण्यात मदत होते आणि संधिरोगाचा दाह कमी होतो.

७) डोळ्याच्या आजारांपासून मुक्तता – डोळ्यातील आजार बरे करण्यासाठी देखील मुलेठी मदत करते. ग्लिसिरिझिन क्रियाकलापांच्या सहाय्याने मुलेठीचा अर्क डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा उपचार करण्यासाठी मदतयुक्त ठरतो.

८) पोटदुखीवर रामबाण – पोटदुखीच्या समस्येवर मुलेठी खूप फायदेशीर आहे. यासाठी १ चमचा मधासह मुलेठी पावडरचे सेवन केल्यास पोटदुखीचा अंत होतो.

९) मूत्र जळजळपासून आराम – ज्या लोकांना लघवी जळल्याची तक्रार आहे, अशा लोकांनी १ कप दुधासह एक चमचा मुलेठीच्या पावडरचे सेवन करावे. यामुळे मूत्र जलजाळीपासून आराम मिळेल.

१०) स्मरणार्थ लाभ – ज्या लोकांना स्मृतीच्या आजाराची तक्रार आहे, त्या लोकांनी मुलेठी जरूर खावी. यामुळे स्मरणशक्ती वाढते. कारण मुलेठी मेंदूच्या कार्यास उत्तेजन देण्यास मदत करते. मुलेठीमध्ये अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी असते ज्याचा मेंदूच्या पेशींवर खूप खोल परिणाम होतो आणि मेंदूच्या कार्यात प्रगती होते.