| | | |

आपणांस माहीत आहे का? पेरू आहे औषधी गुणांचे भांडार, ‘या’ आजारांना करतो नष्ट आणि ठेवतो तंदुरूस्त

हॅलो आरोग्य ऑनलाईन । पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला Guava  म्हणतात.  पेरू फळात “क’ जीवनसत्त्वाशिवाय ‘अ’ जीवनसत्व व लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही द्रव्येदेखील उपलब्ध आहेत. पेरू हे ताजे असताना खूप रुचकर व स्वादिष्ट फळ आहे. पेरूपासून जॅम, जेली, पेस्ट, नेक्टर व इतर पेये तयार करतात. खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर “क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ आहे.

 

चला तर पाहुयात पेरूचे औषधी गुणधर्म आणि फायदे

 • पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला असता मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.
 • दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे तसेच ग्लुकोज, टॅनिन अ‍ॅसिड या घटकांमुळे जेवण सहजरीत्या पचते. सहसा पेरू खाताना त्यावर संधव व जिरे मिरे पूड घालून खावे. यामुळे पेरूमध्ये असणारे कफकारक व वातकारक गुण दूर होऊन पेरू बाधत नाही. पेरू हे अत्यंत कमी पैशात पुरेपूर पोषण देणारे असे फळ आहे. पिकलेला पेरू हा आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहे. पेरुचे सदाहरित झाड असते, पाने जाड, गोलसर, कडक, व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.
 • पिकलेल्या पेरूची भाजी करून खाता येते. तसेच पेरूचा जाम, कोशिंबीर, चटणी, रायते व मुरंबाही करता येतो. हे सर्व पदार्थ रुचीकारक असल्यामुळे अरुची, भूक मंदावणे, आम्लपित्त या विकारांवर पेरूचे विविध प्रकार करून खावेत.
 • पेरूतील बी काढून त्याचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा व त्यात गुलाब पाकळ्या, वेलची, खडीसाखर, पाणी घालून सरबत करावे. या सरबतामधून व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात मिळत असल्याने थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो व शरीराचा दाह कमी होतो.
 • मलावरोधाचा त्रास होत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरूचे सेवन करावे किंवा त्याची भाजी बनवून खावी, यामुळे आतडय़ांची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होते. मलावरोधाचा त्रास होत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरुचे सेवन करावे किंवा त्याची भाजी बनवून खावी, यामुळे आतडयाची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होते. पेरुला काळ्या मिठासोबत खाल्ले तर पचनसंबंधी समस्या दूर होतात. पचन क्रिया खूप चांगली होती. पेरू तुमच्या पचन क्रियेला दुरुस्त करतो. तसेच तुमचे मेटाबॉलिज्म जलद करतो. तसेच रोग प्रतिरोधक असल्याने तुमच्या शरिरातील अनेक अशुद्धी तो बाहेर टाकतो.
 • पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार, हिरडय़ांची सूज व मुख विकार दूर होतात.
 • कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड लागतो. पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे फळ खाणे त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम करते. पिकलेल्या पेरूपेक्षा कच्च्या पेरुत व्हिटामिन सीची मात्रा अधिक असते.
 • पेरूची पाने रुची उत्पन्न करणारी असल्याने व ग्राहीगुणधर्माची असल्याने अतिसारामध्ये पानांचा काढा करून पिल्यास जुलाब कमी होतात. तसेच वारंवार पोटात मुरडा येऊन जुलाब झाल्यास गुदभ्रंश होतो तेव्हा पेरूच्या पानांचे पोटीस बनवून गुदभागी बांधल्याने गुदभ्रंश दूर होतो व तेथील सूज कमी होते.
 • स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या श्वेतपदर या आजारावर पेरूच्या कोवळ्या पानांचा काढा करून प्यावा.
 • बालके, गर्भवती स्त्रिया, अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन करावे. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे व इतर पौष्टिक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ व मजबूत होते.
 • शरीराच्या एखाद्या भागावर सूज येऊन तो भाग ठणकत असेल तर पेरूच्या पानाचे पोटीस करून बांधावे, यामुळे तेथील सूज ओसरून ठणक कमी होतो.
 • गर्भवती स्त्रीला जर उलटी, मळमळ असा त्रास होत असेल तर पेरूचे सरबत थोडय़ा थोडय़ा अंतराने पीत राहावे. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन उलटी, मळमळीची भावना कमी होऊन भूक चांगली लागते.