Medicinal uses of leafy vegetables included in your diet

आपल्या आहारात समावेश करण्यात येणाऱ्या पालेभाज्यांचे औषधी उपयोग

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपण जर आपल्या आहारात पालेभाज्यांचा वापर हा केला तर तो आपल्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या आहारात जर पालेभाज्या असतील तर त्यावेळी त्याच्यामध्ये असलेल्या फायबर मुळे आपल्या शरीरातील पोटाची स्वछता होण्यास मदत होते. त्यामुळे पोटाच्या समस्या सुद्धा जास्त प्रमाणात निर्माण होत नाहीत. आहारात समावेश असलेल्या पालेभाज्यांमुळे काही लाभकारक घटक आपली शरीराला मिळतात . जाणून घेऊया प्रत्येक भाजीचे आहारात असलेले महत्व .

पालेभाज्यांचे औषधी उपयोग —

— कोथिंबीर कोथिंबीर हि आपल्याला आपल्या आहारातील पदार्थाना चव देण्यासाठी मदत करते . तसेच ते सुवास सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने देते. उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

— पालक हि मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.

— माठ हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.

— चाकवत ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

— अळू याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.

— अंबाडी मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.

— घोळ हि भाजी मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. आपल्या लघवीच्या समस्या कमी करण्यासाठी घोळाच्या भाजीचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो.

— तांदळी या भाजी जास्त करून महिलांनी खाल्ली जावी त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते . बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.

— मेथी हि सर्वांची आवडती भाजी आहे तिचा वापर हा आहारात जास्त केला जातो. मेथीपासून वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थ सुद्धा बनवले जातात. या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.

—- शेपू हि भाजी वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.

—- शेवगा ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.