| | | |

दुधाच्या सायीतील पोषक तत्त्वे आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दूध उकळल्यानंतर ते थंड होताना त्यावर एक जाडसर ठार जमा होतो ज्याला आपण साय म्हणतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दुधाची साय खायला आवडते. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का या सायीमध्ये अनेक पोषक घटक समाविष्ट असतात. दुधाची साय खायला जितकी चविष्ट तितकीच आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टीक असते. दुधाच्या सायीमध्ये कॅलरीज, प्रथिने, फॅट, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस आणि लैक्टोज भरपूर प्रमाणात असते. या शिवाय व्हिटॅमिन A, D, E व K ह्या जीवनसत्त्वांचे प्रमाणही दुधाच्या सायीत मोठ्या प्रमाणात असते. चला तर जाणून घेऊयात दुधाच्या सायीचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-

१) व्हिटॅमिन बी १२’ने परिपूर्ण – दुधाच्या सायीमध्ये व्हिटॅमिन-बी १२ चे प्रमाण अधिक असते. उच्च आरोग्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत व्हावी यासाठी व्हिटॅमिन बी १२ महत्वाचे कार्य करते. तसेच हे केस आणि नखांचे आरोग्यदेखील सुधारते.

२) मेंदूच्या कार्यप्रणालीत सुधार – दुधाच्या सायीत असणारे व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन- ई आणि फॉस्फरस हे पोषकघटक मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे अल्झासारख्या आजारापासून दूर राहण्यास दुधाची साय मदत करते.

३) मानसिक तणावावर नियंत्रण – मानसिक तणाव दूर करण्यासाठी दुधाची साय फायदेशीर आहे. कारण दुधाच्या सायीमध्ये व्हिटॅमिन- बी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे मानसिक तणाव नियंत्रणात येतो आणि नैराश्यापासून मुक्तता होते.

४) हाडांमध्ये बळकटी – हाडांसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन डी. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक दुधाच्या सायीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. शिवाय हिरड्या आणि दातसुद्धा मजबूत होतात.

५) निरोगी डोळे – दुधाच्या सायीत व्हिटॅमिन- ए भरपूर असते. हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे डोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. परिणामी मोतीबिंदू, काचबिंदू (ग्लूकोमा) यासारख्या रोगांपासून संरक्षण मिळते.

६) त्वचेसाठी फायदेशीर – दुधातील लैक्टिक ऍसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड हे त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामुळे दुधाची साय त्वचेवर लावल्यास चेहरा तजेलदार व सुंदर होण्यासाठी मदत होते.

० महत्वाची माहिती –

१) दररोज दुधाची साय खाण्यापेक्षा कधीतरीचं ती खा.

२) एका दिवसात १ चमचापेक्षा अधिक दुधाची साय खाऊ नका.

३) हृदय विकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, पक्षाघात, लठ्ठपणा या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांनी दुधाची साय खाऊ नये.

४) ज्या रुग्णांना दुधाची एलर्जी आहे त्यांनी दुधाची साय खाणे प्रामुख्याने टाळले पाहिजे.

५) दुधाच्या सायमध्ये सैचुरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक आढळते. यामुळे लठ्ठपणा व रक्तातील वाईट असे LDL कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. यामुळे दुधाची साय खाण्याचे प्रमाण मनाप्रमाणे नको गरजेप्रमाणे ठेवा.