| |

मॉंक फ्रुट जितकं गोड तितकं शुगर फ्री; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल अनेक लोकांमध्ये मधुमेहाचा त्रास असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अश्या रुग्णांना साखर आणि साखरयुक्त पदार्थांपासून विशेष अंतर ठेवावे लागते. दरम्यान आरोग्य टिकविण्यासाठी किंवा आजारातून उठल्यावर शरीररिक शक्तीकरिता डॉक्टर पालेभाजी आणि फळांचा आहारात समावेश करण्यास सांगतात. परंतु यातही मधुमेहींना गोड फळे खाण्यावर विशेष नियंत्रण ठेवावे लागते आणि पुन्हा एकदा ते बंधनाच्या चौकटीत येतात. मात्र आता चौकटीत राहून जगण्याची गरजच नाही. मॉंक फ्रुट हे एक असे फळ आहे जे साखरेपेक्षा ३०० पट गोड आहे. मात्र तरीही यात मुळात साखर कुठेच नाही. होय. हे खरं आहे.

मॉंक फ्रुट या फळात साखर नाही. म्हणजेच ते अगदी १००% शुगर फ्री आहे. या फळाचे उत्पादन चीन देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. मात्र आता या फळाचे उत्पादन आपल्या भारतातही सुरु करण्यात आले आहे.हिमाचल प्रदेशातील पालनपूर येथे सी.एस.आय.आर आणि आय.एच.बी.टी. यांनी संयुक्तपणे या फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. यामुळे निश्चितच आता भारतीय देखील या फळाचा आस्वाद घेऊ शकतात. मुख्य म्हणजे हे फळ मधुमेह आजाराने ग्रसित असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याचे आहे. कारण या फळातील मोग्रोलाईड नावाचे द्रव्य हे आपण खातो त्या साखरेपेक्षा अत्याधिक पटीने गोड आहे. त्यामुळे हे फळ खाल्ले असता आपण एखादा गोड पदार्थ खाल्ल्याचेच भासते.

शिवाय, मॉक या फळामध्ये अमायनो एसिड्स, फ्रुक्ट्रोज, खनिजे, जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे हे फळ आपल्या शारीरिक आरोग्यासाठी देखील अतिशय फलदायी आहे. शिवाय हे फळ नुसतेच खाण्याऐवजी त्याचा वापर पेय पदार्थ म्हणून किंवा भाजून करावयाच्या पदार्थांमध्ये सहजोगत्या करता येतो. विशेष म्हणजे, भारतामध्ये शेतकऱ्यांना या फळाची लागवड करता येईल यामुळे त्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आता त्यांना आणखी एक स्रोत मिळणार आहे. या फळाचे एकरी उत्पन्न दीड लाखापर्यंतची वाढ शेतकऱ्यांना देऊ शकते.