| |

मुखशुद्धी करणारी बडीशेप देते आरोग्यवर्धक फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय खान पान योजनेत जेवल्यानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाहुणे देखील जेवायला आले असतील तर जेवल्यानंतर मुखशुद्धी म्हणून बडीशेप हातावर ठेवलीच पाहिजे. इतकेच काय तर, हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतरसुद्धा आपण बडीशेप आवर्जुन खातो. शिवाय अनेक पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर विशेष चवीसाठी केला जातो. पण तुम्हाला काय वाटत? बडीशेपचा वापर केवळ मुखशुद्धी करणे इतक्यासाठीच आहे का? तर याच उत्तर आहे नाही. होय.. कारण बडीशेपचा वापर तेवढ्यापुरताच होत नाही तर त्याचे इतरही आरोग्यवर्धक फायदे आहेत ज्यांबद्दल आपण कधी माहित करून घेण्याची तसदीक घेतलेली नाही.
बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन यांसोबत अनेको पोषक तत्व समाविष्ट असतात. ज्यामुळे आरोग्याला बराच फायदा होतो. मुख्य म्हणजे, बडीशेपचे सेवन केल्यामुळे पोटाच्या अनेक विकारांपासून मुक्तता मिळते. कारण बडीशेप अपचन, पोटदुखी, मुरडा अश्या समस्यांवर प्रभावी आहे. इतकेच नव्हे तर श्वासासंबंधीत आजारात औषध म्हणून बडीशेप वापरली जाते. चला तर जाणून घेऊयात दररोज बडीशेप खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे होतात? खालीलप्रमाणे:-

१) जर तुम्हाला खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नसेल आणि यामुळे अजीर्ण किंवा मळमळ होत असेल किंवा पचनाचा त्रास त्रास नियमित जेवणानंतर होत असेल तर अश्या लोकांनी बडीशेप आवर्जून खावी. यामुळे पचन होण्यास मदत होते. शिवाय मळमळ थांबते आणि पचनाचा त्रास दूर होतो.

२) बडीशेपसोबत मध मिसळून खाल्ल्याने अगदी जुनाट खोकला जरी असेल तरीही तो कमी होण्यास मदत होते.

३) दररोज रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप आणि साखर बारीक करून कोमट पाण्यासोबत घेतल्यामुळे बद्धकोष्टता तसेच गॅससारख्या त्रासांपासून आराम मिळतो.

४) कच्ची बडीशेप आणि पत्री खडीसाखर एकत्र वाटून खाल्ल्यास डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे डोळ्यांची दृष्टी व्यवस्थित राहते.

५) अपचनाचा त्रास असेल तर जेवल्यानंतर बडीशेप खाणे अतिशय फायेदेशीर आहे. यामुळे जेवण चांगलं पचतं. शिवाय काळं मीठ, जिरं, बडीशेप एकत्र चूर्ण करून कोमट पाण्यासोबत प्यावे. पचनक्रियेसाठी हे एक उत्तम चूर्ण मानले जाते.

६) पोटदुखीच्या त्रासावर भाजलेली बडीशेप प्रभावी आहे. त्यामुळे पोटदुखीसाठी भाजलेली बडीशेप हातावर चोळून खावी.

७) उन्हामुळे जळजळ होत असल्यास बडीशेपचे सरबत किंवा बडीशेप भिजवलेले पाणी प्यावे.

८) उलटीचा त्रास होत असेल तर लगेच बडीशेप तोंडात टाकून चावून चावून रस गिळत खावी. यामुळे तात्काळ आराम मिळतो.

९) रोज सकाळी ग्लासभर बडीशेप भिजवलेल्या पाण्यामध्ये मध मिसळून प्यावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय शरीर कार्यशील राहते.

१०) बडीशेप रक्तशुद्धीकरणाचे काम करते. त्यामुळे बडीशेप खाणे फायदेशीर आहे.

११) त्वचेच्या आरोग्यासाठी दररोज बडीशेप खाणे लाभदायक आहे. यामुळे रक्तशुद्ध झाल्याने त्वचेवर येणारे पुरळ नाहीसे होतात.

१२) एका संशोधनानुसार रोज बडीशेप खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरच्या समस्येचा धोका कमी होतो, असे निष्पन्न झाले आहे.

१३) आपण सारेच जाणतो, कि तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी बडीशेप मदत करते.