| | |

मोठमोठ्या आजारांवर मोहरीच्या बिया गुणकारी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एखाद्या पदार्थाला फोडणी द्यायची म्हटली कि, मोहरीशिवाय फोडणी ती काय? तेलात तडतडणारी मोहरी स्वतःचा एक वेगळाच स्वाद त्या पदार्थात सोडते. मोहरीला इंग्रजीत मस्टर्ड, तामिळ आणि मल्याळममध्ये कडूगु, तेलुगूमध्ये अवालू, बंगालीमध्ये मोहोरी आणि पंजाबीमध्ये राई म्हटलं जातं. अनेकांना मोहरीचा हा एवढाच उपयोग माहित आहे. पण, मोहरी एक असे बियाणे आहे जे मोठमोठ्या आजारांना चुटकीत गायब करून आपल्याला निरोगी आरोग्य देऊ शकते. यात कॅन्सर, मायग्रेन, दमा, कंबरदुखी यासारख्या अनेक रोगांचा समावेश आहे. जर तुम्हाला मोहरीचे गुणकारी लाभ माहित नसतील तर हा लेख जरूर पूर्ण वाचा आणि जाणून घ्या मोहरीच्या पावरफुल उपायांची माहिती खालीलप्रमाणे:-

१) मायग्रेन – मायग्रेनचे दुखणे हे प्रचंड प्रमाणात असते. हि एक प्रकारची डोकेदुखी असली तरीही इतकी असह्य असते कि जणू डोकेफोड करावे वाटेल. यामध्ये डोक्यावर कोणीतरी हातोडी मारत असल्यासारखे वाटते. केवळ अर्ध्या डोक्याच्या बाजूस होणारे हे दुखणे इतके असह्य असते कि कधी पूर्ण डोके दुखते तर कधी अर्धशिशी. यासाठी मोहरी उत्कृष्ट औषध आहे. कारण मोहरीतील मॅग्नेशियम मायग्रेन ही समस्या कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे मोहरीचे तेल वा मोहरी खाणे मायग्रेनसाठी लाभदायक आहे.

२) दमा – मोहरीच्या दाण्यांमध्ये सेलेनियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. मुख्य म्हणजे हे दोन्ही घटक अँटीइन्फ्लेमेटरी असते. तसेच मोहरी रोज खाल्ल्याने दमा असलेल्या रूग्णाला श्वास घेण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळते. शिवाय मोहरीमुळे सर्दीही ठीक होते आणि छातीत जमा झालेला कफ काढण्यासाठीही मदत होते.

३) मधुमेह – मोहरीचे बी हे मधुमेहासारख्या रोगापासून मुक्त करते. एका संशोधनानुसार, मोहरीच्या दाण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असते. जे ताण तणावापासून मुक्त करतात. तसेच शरीरातील ग्लुकोजचे प्रमाणही मोहरीच्या दाण्यांमुळे कमी होण्यास मदत होते.

४) कर्करोग – कर्करोगाला मात देणारा ग्लुकोजेल ओलेट हा विशेष गुणधर्म मोहरीमध्ये असतो. यामुळे कर्करोगाचा ट्यूमर वा गाठ बनत नाही. मोहरीमध्ये फायटोन्यूट्रीयन्ट्सदेखील असतात. जे विशेषतः गॅस्टोइंटेस्टायनल कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करतात. परिणामी रोज मोहरी खाल्ल्यामुळे कर्करोग होण्याची शंकादेखील कमी होते.

५) संधिवात – संधिवात अर्थात अर्थरायटिस यामध्ये गुढघे, हात आणि शरिरातील अन्य भागांमध्ये दुखणे जाणवते. परिणामी चालण्या – फिरण्याला तसेच धावण्याला मर्यादा येतात. यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केल्यास आराम मिळतो. मोहरीमध्ये असलेल्या सेलेनियम आणि मॅग्नेशियममुळे खूपच चांगला फायदा होतो. यामुळे, विशेषतः रूमेटिक आर्थरायटिसमुळे आजारी असलेल्या रूग्णांना मोहरीच्या तेलाने मालिश करणे लाभदायक ठरते.