| | | | |

नैसर्गिक नारळाचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। नारळाचे झाड कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते हे आपण सारेच जाणतो. याचे कारण असे कि या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध ठेवतो. असा हा नारळ अत्यंत लोकोपयोगी आहे. मुख्य म्हणजे नारळाचे तेल खाण्यायोग्य अर्थात शरीराची आतून काळजी घेणारे तसेच त्वचेचे रक्षण करणारे असते. त्यामुळे नारळाच्या तेलाचे विशेष महत्व आहे. शिवाय नारळाच्या तेलामध्ये खूप नैसर्गिक आणि औषधी गुण समाविष्ट असतात. त्यामुळे नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप स्वास्थ लाभ होतो. शिवाय नारळामध्ये जास्त प्रमाणात लोरिक एसिड असते. जे शरीराला विविध संक्रमणांशी लढण्यास सहायक असते. चला तर जाणून घेऊयात नारळाच्या तेलाचे आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे:-

१) पौष्टिक अन्न – रुचकर आणि पौष्टिक जेवण बनविण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करता येतो. फक्त हे जेवण शिजवताना मंद आचेचा प्रयोग करावा.

२) त्वचेसाठी मॉइश्चरायझर – त्वचेच्या कोणत्याही प्रकारासाठी नारळाचे तेल सर्वोत्तम मानले जाते. पण विशेष करून कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल एखाद्या मॉइश्चरायझरनुसार काम करते. आंघोळीच्या २० मिनीट आधी नारळाच्या तेलाने शरीरावर मसाज केल्यास त्वचेला योग्य पोषण प्राप्त होते आणि त्वचा कोरडी पडत नाही. नारळाचे तेल घामोळ्यासाठी सुद्धा सहायक ठरते. ह्यामुळे आपल्या शरीराच्या घामोळ्या सुद्धा दूर होतील.

३) गुलाबी आणि मुलायम ओठ – नारळाच्या तेलाच्या सहाय्याने ओठांची काळजी घेता येते. अनेकदा वातावरणातील बदल ओठ फुटण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे ओठ निस्तेज होतातच. शिवाय ओठ फाटण्याचीही समस्या निर्माण होते. यासाठी कोरड्या सुकलेल्या ओठांवर नारळाचे तेल लावा आणि ओठांना मऊ तसेच गुलाबी होण्यास मदत करा.

४) नैसर्गिक मेकअप रिमूव्हर – नारळाच्या तेलाचा वापर नैसर्गिक मेकअप रिमूव्हर म्हणून करता येईल. यामुळे चेहऱ्यावरील किंवा डोळ्यावरील मेकअप सहजपणे काढता येतो. यासाठी चेहरा घासावा किंवा रगडावा लागत नाही. परिणामी त्वचेचे नुकसान होत नाही.

५) वॉटरप्रूफ मेकअप रिमूव्हर – नारळाचे तेल अगदी वॉटरप्रूफ मस्करादेखील अगदी सहज दूर करतात. यासाठी कॉटन बॉलवर थोडे नारळाचे तेल घ्या आणि आपल्या डोळ्यावर लावलेला मेकअप साफ करा. यामुळे आयलाइनर किंवा काजळ न पसरता स्वच्छ होते.

६) केसांची काळजी – नारळाच्या तेलात नैसर्गिक गुणधर्म समाविष्ट असल्यामुळे केसांच्या समस्या बघता बघता दूर होतात. यासाठी केसांना दररोज नारळाच्या तेलाने मसाज करा आणि यानंतर केस शैम्पूच्या सहाय्याने धुवून घ्या. यामुळे केस मुलायम होतात आणि केसांची वाढदेखील होते. तसेच नारळाचे तेल डेड्रफच्या त्रासापासून सुटका करते.

७) रक्त संचरण – नारळाच्या तेलाने आपल्या हात पायांच्या बोटांचा मसाज करणे लाभदायक ठरते. कारण यामुळे शरीरातील रक्ताचे संचरण आणि रक्तप्रसार प्रत्येक अवयवांपर्यंत व्यवस्थित होतो. परिणामी आपल्या शरीराची कार्यप्रणाली सुधारते.

८) कोमल टाचा – नारळाच्या तेलाच्या साहाय्याने पायाच्या टाचांची काळजी घेता येते. कारण नारळाचे तेल पायाच्या भेगाळलेल्या टाचांच्या मुलायम करते आणि जखमा भरते. यामुळे टाचा सुरक्षित आणि कोमल राहतात.