dont use other things used by others

इतरांच्या वापरात असलेल्या या गोष्टी कधीच वापरू नयेत

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  अनेकवेळा आपल्याला आपल्या घरात इतरांच्या कोणत्या वस्तू असतील किंवा नवीन वस्तू असतील तर आपण वापरतो. पण जर आपल्याला इतरांच्या वस्तू वापरून काही त्रास होत असेल तर मात्र इतरांच्या वस्तू वापरणे आपण बंद केले पाहिजे. अनेक वस्तू या बऱ्याच काळ वापरल्या असतात. त्यामुळे कदाचित त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे इतरांची कपडे वापरताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे.

अनेक वेळा तसेच चप्पल- समजा तुम्ही एखाद्या मंदीरात गेला आणि तिथे तुमच्या चपला चोरी झाल्या तर रागाने इतरांच्या चपला घालून घरी जावू नका. कारण इतरांच्या चपलांमधील निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. असं म्हणतात की चपला चोरीला जाणं म्हणजे दारिद्र कमी होणं. त्यामुळे कोणाच्याही चपला आपण उचलून घेऊन जाऊ नये. इतरांच्या रूमालामधील घाण अथवा बॅक्टेरियामुळे तुम्हाला इनफेक्शन होऊ शकतं. त्यामुळे इतरांचे वापरलेले रूमाल वापरणं धोक्याचं असू शकतं.

गादी अथवा बेड —-

प्रत्येकाने आपल्या गादी अथवा बिछान्यामध्ये झोपणं हेच हितकारक असू शकतं. इतरांच्या बेडवर झोपण्यामुळे वास्तूदोष होऊ शकतो. इतरांच्या बेडवर झोपल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

कपडे —

बऱ्याचजणांना इतरांचे वापरलेले कपडे घालण्याची सवय असते. भावंडे अथवा मित्र-मैत्रीणींचे कपडे वापरण्यात काहीच चुकीचे नाही असे अनेकांना वाटते. अनेकजण वापरलेले कपडे इतरांना दान करतात. मात्र असे इतरांचे कपडे घालणं धोक्याचं ठरू शकतं. कारण असं केल्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते. तुम्ही जर इतरांच्या वस्तू वापरणार असाल तर मात्र त्या पहिल्या सगळ्या वस्तू या स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत, सगळ्या वस्तुंना बॅक्टरीया पासून दूर केले पाहिजे.

पेन —–

बर्याच लोकांना काहीतरी लिहावं लागतं तेव्हा पटकन इतरांचं पेन ते वापरतात मात्र काम झाल्यावर ते पेन आपल्याच खिषात टाकून निघून जातात. एकतर असं वागणं हे मुळातच चुकीच आहे शिवाय याचे चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. कारण असे केल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी कोणाचेही पेन वापरू नका आणि कोणालाही तुमचे पेन वापरण्यास देऊ नका. कधी कधी अनेक लोकांना लिहताना पेन तोंडात टाकण्याची जास्त सवय असते त्यामुळे ते पेन वापरताना तुम्ही तोंडात टाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.