| |

कितीही नाक मुरडलात तरी मुळा खाल्लाच पाहिजे कारण..; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मुळ्याची भाजी ताटात आली की अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच लगेच नाकं मुरडतात. अगदी दम देऊन खायला लावलात तरीही हे लोक मुळा खात नाहीत. पण मुख्य सांगायची बाब अशी कि वय काहीही असो मुलं खाल्लाच पाहिजे. कारण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी मुलं हा फायदेशीर आहे. पण झालाय असं कि कितीही ओरडून सांगितलंत तरी अनेकांना हि बाब पटत नाही. अगदी सहज याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून आज आम्ही तुम्हाला मूल्याचे फायदे सांगणार आहोत जे सांगितल्यावर तरी किमान याना मूल्याचे महत्व पटेल.

मुळा आणि मुळ्याची पाने दोन्हीही गुणकारी आहेत. कारण मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे उकडून, भाजी बनवून किंवा इतर भाज्या म्हणजेच मटारसोबत मिक्स करुन खाता येतात. शिवाय सॅलडमध्येसुद्धा मुळ्याच्या पानांचा समावेश करता येतो. त्यामुळे आहार तज्ञ सुद्धा मुळा आणि मूल्याची पाने खाण्याचा सल्ला देतात. तरीही घरातल्या व्यक्तींना मूल्याची भाजी खाणे आवडत नसेल तर, मुळ्याच्या पानांची भाजी बनवताना त्यामध्ये चवीनुसार लिंबूचा रस मिसळा. यामुळे भाजीची चव तुरट लागणार नाही. इतकेच काय तर भाजीतील व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढेल ज्यामुळे याचे फायदे अजून वाढतील. मूल्याच्या भाजीचे फायदे पुढीलप्रमाणे :-

१) शारीरिक अशक्तपणा दूर होतो – मुळ्यामध्ये आर्यन, फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन वाढते आणि शरीरातील कमकुवतपणा दूर होतो आणि अख्खा दिवस शरीर कार्यशील राहते.

२) मधुमेह – मुळा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. परिणामी मधुमेहासारख्या आजारापासून बचाव होतो. याकरिता मुळ्याची भाजी, सॅलड किंवा अगदी भजीदेखील फायदेशीर आहे.

३) पचनसंस्था चांगली राहते – मुळ्याच्या पानांमध्ये फायबर असते. जे मुळा खाल्ल्याने आपल्या शरीरात जाते आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. यासाठी मुळ्याच्या पानांचा रस देखील फायदेशीर आहे.

४) लघवीच्या समस्यांपासून आराम – मुळ्याच्या पानांमध्ये असणारे डाययूरेटिक गुण युरिन अर्थात लाघवीशी संबंधीत समस्या दूर करण्यात प्रभावी असतात. त्यामुळे यासाठी भरपूर पाणी आणि पाण्यासोबत मुळा किंवा त्याचा रस अतिशय फायदेशीर आहे.

५) कफ दूर होतो – मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जे छातीत साचणार कफ दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिणे फायदेशीर ठरते. कारण मुळ्याचा रस पिण्यामुळे कफ पातळ होऊन शरीरातून बाहेर पडतो.

६) सांधेदुखीवर परिणामकारक – मुळ्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मुळा कोणत्याही स्वरूपात खाणे शरीरातील हाडांच्या सक्षमीकरणासाठी चांगले आहेत. कारण हे कॅल्शियम जॉईंट पेन टाळण्यास मदत करतात.

७) मूळव्याधीवर इलाज – मुळ्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मूळव्याधीच्या समस्यांवर प्रभावी आहेत.

८) कॅन्सरवर प्रभावी – मुळ्यामध्ये एंथोकायनिन हे रसायन सामायिक असते. जे कॅन्सरसारख्या रोगाचा प्रतिकार करतात. त्यामुळे मुळा रोज आहारात एक मुळा कच्चा किंवा मुळ्याची भाजी, कोशिंबीर खा.

९) उजळ त्वचेसाठी फायदेशीर – त्वचा चांगली होण्यासाठी मुळा किंवा त्याची पाने खावीत. यामुळे मानवी शरीरातील टॉक्सिस्न दूर होतात आणि त्वचा उजळते.