| |

मूत्रपिंडाची काळजी न घेणे देई कर्करोगाला आमंत्रण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल बदलती जीवनशैली अनेको व्याधींचे मूळ कारण होऊ लागली आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार आणि शारीरिक हालचाल अत्यंत गरजेची आहे. शिवाय आपल्या शरीरातील आंतरेंद्रिये सुद्धा सुदृढ असतील तर निरोगी आयुष्याची मजा घेता येते. आपल्या शरीरातील मूत्रपिंड हे एक आंतरकार्यप्रणालीतील प्रमुख अवयव आहे.

मूत्रपिंड आपल्या शरीरात फिल्टरसारखे काम करत असते. शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मूत्रपिंड मदत करते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी मूत्रपिंडाकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण, अयोग्य पद्धत आणि हानिकारक आहारामुळे मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. परिणामी, कर्करोगाची समस्या उद्भवते. हि अशी समस्या उदभवू नये म्हणून, मूत्रपिंडाने योग्यरित्या कार्य केले पाहिजे. याकरिता आपण आपल्या आहारात काही अश्या पदार्थांचा समावेश करायला हवा जे आपल्या मूत्रपिंडाच्या सक्षमीकरणास मदत करतात.

१) लसूण – लसूणमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अत्यंत कमी असते. जे मूत्रपिंडाशी संबंधित रोगाच्या रुग्णांसाठी चांगले असते. त्यामुळे आहारात लसूणचे सेवन केल्याने मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते.

२) पालक – मुख्य म्हणजे, हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, लोह, मॅग्नेशियम आणि फोलेट जास्त प्रमाणात असते. शिवाय पालकात बीटा कॅरोटीन असते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे मूत्रपिंड निरोगी होण्यासाठी पालका आहारात समावेश करा.

३) शिमला मिरची – शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. शिवाय, त्यात व्हिटॅमिन C सारखे महत्त्वपूर्ण घटक समाविष्ट असतात. यामुळे मूत्रपिंड चांगल्या स्थितीत राहण्यासाठी आहारात शिमला मिरची असायला पाहिजे.

४) कोबी – कोबी हा व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबरचा अगदी उत्तम स्रोत आहे. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासह अन्य विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी कोबी मदत करते. शिवाय त्यात सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मूत्रपिंडावर कोणताही प्रकारचा दबाव येत नाही.

५) अननस – अननस रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. कारण, यात फायबरचे प्रमाण जास्त असते. जे मूत्रपिंडाच्या आजारापासून बचाव करण्यास मदत करते. शिवाय अननस मॅंगनीज आणि व्हिटॅमिन सी’ने सुद्धा समृद्ध असते. जे एंजाइम्सची जळजळ कमी करण्यास मदत करते.