| |

झोप पूर्ण होत नाही? मग वेळीच करा उपाय, नाहीतर भोगावे लागतील दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। रोजच्या धावपळीत अनेकांना कमी झोप घेणे किंवा निद्रानाशाचा त्रास जाणवत असतो. मात्र ही बाब दिसते तितकी आधी नसून हा एक गंभीर विकार आहे आणि याचा परिणाम थेट आपल्या हृदयावर होत असतो. इतकेच नव्हे तर अपुऱ्या झोपेमुळे अनेक रोगांचा सामना करावा लागतो. आरोग्य क्षेत्र संशोधन संबंधित जर्नल एल्सेवियर या मासिकात लिहिल्याप्रमाणे अपुऱ्या झोपेचा आरोग्याशी अगदी जवळचा संबंध आहे. तो काय व कसा हे आपण जाणून घेऊयात.

– अपुरी झोप मनातील नकारात्मकता वाढवते यामुळे अश्या व्यक्तींच्या मनात आत्महत्येचे विचार वाढू शकतात.

– अर्धवट झोपेमुळे रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोक अशा आजारांना मानवी शरीर निमंत्रण देते.

– आरोग्य क्षेत्र संशोधन संबंधित जर्नल एल्सेवियर या मासिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार गरजेपेक्षा तासभर देखील कमी झोप झाल्याने हृदयविकाराचा धोका तब्बल २४% ने वाढतो.

– शारीरिक वा मानसिक गरजेपेक्षा कमी निद्रा/झोप घेतल्यामुळे म्हातारपण लवकर येते.

– शरीरातील अँटीबॉडीज ५०% कमी प्रमाणात तयार होतात. यामुळे कोणत्याही रोगाचे आपल्याला सहज संक्रमण होऊ शकते.

– नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार दररोज ७ तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना फ्ल्यू होण्याचा धोका जास्त असतो.

लक्षात ठेवा :

अ ) ज्या लोकांना निद्रानाशाचा विकार आहे त्यांनी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना विश्वासात घेऊन आपल्या समस्येची माहिती देणे अनिवार्य आहे अन्यथा मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल.

ब ) झोप येण्याकरीता ध्यानधारणा सारखे उपाय योजून झोपेचा कोटा पूर्ण करावा.

क ) निद्रानाशाचा विकार असलेल्या व्यक्तीने एकटे झोपणे टाळावे.

*अत्यंत महत्वाचे – योग्य वेळी आपला आजार मान्य करून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसारच औषधे घ्यावीत.